मुंबई: नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 25 वैद्यकीय कर्माचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही राज्यात लॉकडाउन 31 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Coronavirus Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ठोस पाऊले उचलताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही राज्यात लॉकडाउन 31 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. यातच देशावर कोरोना विषाणूचे संकट वावरत असताना आपल्या जीवाची पर्वा करता नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे तोंडभरून कौतूक केले जात आहेत. यातच मुबई (Mumbai) येथील रुग्णालयातील 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना (Medical Staff) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचया अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कोरोना विषाणू संपूर्ण भारतात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 3 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. या संकटाच्या काळात नागरिकांना उत्यावश्यक सेवा देण्याकरिता डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी आपल्या ठामपणे उभे आहेत. मात्र, मुंबई येथे रुग्णांची सेवा करणाऱ्याना 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांचा क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Lockdown: सांगलीमध्ये करोनाचा रुग्ण आढळल्याने इस्लामपूर शहरात 100 टक्के लॉकडाउन जाहीर; केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

एएनआयचे ट्वीट-

भारतात आतापर्यंत एकूण 9 हजार 352 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 324 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 980 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 2064 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.