BJP Corporators Joins Shiv Sena: मोठी बातमी! जळगावात भाजपला मोठा धक्का, 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, राज्य सरकारने स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे.

11 BJP corporators from Jalgaon to Joins Shiv Sena (Photo Credit: Twitter)

ज्येष्ठ नेते एकनाक खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला (BJP) लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर आणि बोधवड महानगरपालिकेतील 11 नगरसेवकांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधून घेतले आहे.

भाजपच्या बोदवडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 11 नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचबरोबर मुक्ताईनगरचे गटनेतेही शिवसेनेत दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात मुक्ताईनगर जिल्हा परिषदेमध्येही अशीच स्थिती राहील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. हे देखील वाचा- Temples Reopen in Maharashtra: नवरात्रीच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुली होणार धार्मिक स्थळं; 'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य

एकनाथ खडसे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अनेक भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. परंतु, खडसे यांचे समर्थक राष्ट्रवादी सामील न होता शिवसेनेत दाखल झाले आहेत. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.