मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार स्थिर, अस्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा म्हणजे निव्वळ पोटदुखी - संजय राऊत
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार स्थिर आहे. चिंता नसावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात काल सायंकाळी भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यामुळे सरकार स्थिर आहे. सरकारच्या स्थिरतेबाबत कोणी बातम्यांचा धुरळा उडवीत असेल तर ती निव्वल पोटदुखी समजावी, अशा शब्दांत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी''.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काल सायंकाळी एक बैठक पार पडली. शरद पवार यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुढच्या काही तासांमध्येच ठाकरे आणि पवार या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीतील नेमका तपशील बाहेर आला नाही. मात्र, संजय राऊत यांच्या ट्विटनंतर त्याबाबतचा काही तपशील बाहेर आला आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यंच्यात बैठक, राजभवनावर राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या; चर्चांना उधान)
संजय राऊत ट्विट
खा. संजय राऊत यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे.. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. Boomerang...जय महाराष्ट्र''
संजय राऊत ट्विट
दरम्यान, अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, राज्यातील सरकार पूर्णपणे स्थिर आहे. त्याबाद्दल कोणीही काळजी करु नये. पवार आणि ठाकरे यांच्या भेटीबीबत शिवसेनेने सांगितलेच आहे. हे सरकार स्थिर आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. सध्या सरकारचे लक्ष केवळ कोरोना व्हायरस नियंत्रण करण्यार असल्याचेही मलिक या वेळी म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)