Love Affair and Murder: पुणे येथील व्यवसायिकाची गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हत्या, मैत्रिणीसह दोघांना अटक
या प्रकरणात असम पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (वय 44) असे व्यवसायिकाचे (Pune-Based Businessman) नाव आहे. तो व्यापारी होता.
पुणे (Pune) येथील एका व्यावसायिकाचा गुवाहाटी (Guwahati) येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात असम पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (वय 44) असे व्यवसायिकाचे (Pune-Based Businessman) नाव आहे. तो व्यापारी होता. प्राप्त माहितीनुसार, सदर महिला व्यावसायिकाची प्रेयसी होती. पाठिमागील प्रदीर्घ काळापासंन ते एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, व्यवसायिकाचा झाला नसून त्याची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना होता. त्यावरुन पोलिसांनी ही कारवाई केली. अंजली शॉ (25) असे अटक करण्यात आलेल्या सशयीत महिलेचे नाव आहे. तर विकास कुमार शॉ (२३) असे दुसऱ्या संशयिताचे नाव आहे.
हॉटेल रेडिसन ब्लू येथे व्यावसायिकाचा मृत्यू
पोलीस आयुक्त दिगंता बोराह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार, 5 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लू (Radisson Blu Hotel) येथे उघडकीस आली. याच हॉटेलमध्ये पीडित आणि संशयीत यांच्यात मोठे भांडण झाले. या भांडणातून परस्परांमध्ये हाणामारी झाली. व्यवसायिकाचा फोन आणि त्यातील फोटो यावरुन हे भांडण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडिताच्या (व्यवसायिक) फोनमध्ये असलेले फोटो पुन्हा मिळविण्याच्या उद्देशाने संशयीत आरोपी हॉटेलमध्ये आले होते. या वेळी त्यांच्यात वाद झाला आणि प्रकरणाला हिंसक वळण मिळाले. या वेळी झालेल्या हाणामारीत कांबळे हे गंभीर जखमी झाले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा, Kerala Man 133 Years Jail: केरळमधील 42 वर्षीय व्यक्तीस 133 वर्षे तुरुंगवास; जाणून घ्या कारण)
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त
अटक करण्यात आलेल्या व्यक्ती, दोघेही पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना विमानतळावर जाताना पकडण्यात आले. जिथे त्यांनी कोलकात्याला जाण्यासाठी फ्लाइट बुक केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि पीडितेच्या स्थितीबद्दल हॉटेल व्यवस्थापनाला अलर्ट करण्यासाठी वापरलेल्या मोबाइल फोनच्या आधारे त्यांना रोखले. (हेही वाचा, Pune Suicide Case: प्रियकराच्या दुसऱ्या अफेअरमुळे धक्का, प्रेयसीची नैराश्येतून आत्महत्या; आरोपीविरोधात गुन्हा दाखल)
व्यावसायिकाच्या हत्येचा कट?
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पुण्यातील व्यापारी संदीप सुरेश कांबळे हा कोलकाता येथील 25 वर्षीय महिला आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकराने रचलेल्या प्राणघातक कटाला बळी पडला. सप्टेंबर 2023 मध्ये कोलकाता येथे व्यवसायाच्या प्रवासादरम्यान व्यवसायिक आणि महिला यांची ओळख झाली. जी पुढे वाढत गेली. दरम्यान, अनेक शहरांमधील हॉटेल्समध्ये भेटीदरम्यान त्यांची जवळीक वाढली आणि शेवटी त्यांनी लग्नाबाबत बोलणी केली.
दरम्यान, आरोपी महिला ही आगोदरच विवाहीत आहे. मात्र, विविध हॉटेलमध्ये घालवलेल्या खासगी क्षणांचे व्हिडिओ, फोटो वापरुन ती त्याच्यावर आर्थिक दबाव टाकत होती. व्यवसायिकाला मात्र तिच्यासोबत विवाह करायचा होता. व्यावसायिक असलेल्या कांबळे यांच्या मोबाईलमध्ये आपले काही खासगी फोटो असल्याचे आरोपी महिलेला संशय होता. हे फोटो मिळविण्यासाठी ती त्याच्यावर सतत दबाव टाकत असे. त्यातूनच गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये त्यांच्यात टोकाचे भांडण झाले. दरम्यान, आरोपी महिला आणि तिच्यासोबतच्या आणखी एकाने गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये असलेल्या कांबळे (व्यावसायिक) यांच्या फोनमधून फोटो आणि इतर पुरावे नष्ट करण्याची योजना आखली. त्यासाठी कांबळे यांना रात्रीच्या वेळी झोपेच्या गोळ्या आणि भांग घातलेल्या मिठाई देऊन शांत करण्याची त्यांची योजना होती. त्या हेतूने जोडपे सोमवारी स्वतंत्रपणे गुवाहाटी येथे पोहोचले आणि रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकत्र आले. दरम्यान, त्यांचे भांडण झाले आणि कांबळे यांचा संशयास्पद मृत्यू झाला.