Lote MIDC Fire: रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मध्ये आग; 6-7 कामगार होरपळले

उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

रत्नागिरी (Ratnagiri)  जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी (Lote MIDC) मध्ये आज आग लागल्याची घटना समोर आली आहे. 'डिव्हाईन' कंपनी मध्ये ही आग भडकली आहे. चिपळून मध्ये या आगीत काही कामगार होरपळल्याची देखील माहिती समोर आली आहे. या कामगारांना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.  वेल्डींग सुरू असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.

मीडीयाशी बोलताना सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. 6-7 जण जखमी आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार आतमध्ये आग भडकलेली नाही. इतर काळजी घेण्याचे आदेश दिल्याचीही माहिती यावेळी सामंत यांनी दिली आहे.

लोटे एमआयडीसी मध्ये एप्रिल 2021 मध्येही आग लागली होती. तेव्हा भडकलेल्य आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू देखील झाला होता.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif