Pune Lonavala Bhushi Dam: लोणावळा येथील भुशी डॅम परिसरातील विक्रेत्यांचे अनधिकृत ठेले हटवले; चहा, भजी, कणीस मिळविण्यासाठी पर्यटकांची धावाधाव

लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, भजी विक्रेते, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती.

Pune Lonavala Bhushi Dam: लोणावळा येथील भुशी डॅम परिसरातील विक्रेत्यांचे अनधिकृत ठेले हटवले; चहा, भजी, कणीस मिळविण्यासाठी पर्यटकांची धावाधाव

लोणावळ्यात (Lonavala) दोन कुटुंब वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 24 तास उलटायच्या आतच प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अतिक्रमाण हटवायला सुरुवात केली आहे. भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे. मात्र हा कारवाईत सातत्य राहणं गरजेचं आहे.  (हेही वाचा - Lonavala Falls Incident: पुणे प्रशासनाने पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जारी, जाणून घ्या, अधिक माहिती)

लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, भजी विक्रेते, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.  पुणे आणि मुंबई यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक हे केवळ भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात.  मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी गर्दी  झाली आहे. दोन दिवसापूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली.

दरम्यान पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या पुण्यातील लोणावळ्यात दिवसभर धो धो पाऊस झाला आहे.  यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 136 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यंदा 12 जूनला 106 मिलीमीटर पाऊस कोसळला होता, त्यानंतर काल पावसाने तुफान बॅटिंग केली. आत्तापर्यंत या मोसमात 798 मिमी पावसाची नोंद झालीये.

(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2024 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).