मुंबई: झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचं मतदान जनजागृतीसाठी विशेष अभियान; प्रिस्क्रिप्शन नोटपँड वर  Vote for Healthy Nation चा दिसणार ठप्पा 

प्रिस्क्रिप्शन नोटपँडवर ‘Vote for Healthy Nation’ असा ठप्पा दिसणार आहे.

Voting | Image used for representational purpose | (Photo credits: PTI)

Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्रामध्ये यंदा लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचाराची धामधूम सर्वत्र सुरू आहे. महाराष्ट्रात चौथ्या आणि अंतिम टप्प्यात होणारे मतदान 29 एप्रिल दिवशी आहे. मुंबईकरांना मतदानाचे (Mumbaikars Voters) आवाहन सार्‍याच स्थरांमधून केले जात आहे. आणि आता यामध्ये वैद्यकीय क्षेत्रही उतरणार आहे. चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयानेही (Zen Multi Specialty Hospital) आता मतदान जन जागृतीसाठी विशेष अभियान सुरू केले आहे. प्रिस्क्रिप्शन नोटपँडवर ‘Vote for Healthy Nation’ असा ठप्पा दिसणार आहे.

सोमवार, 22 एप्रिल पासून चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयातर्फे मदतान जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत डाँक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील सर्व कर्मचारी सहभागी होऊन नागरीकांना मतदानाचे आवाहन करणार आहे.  “सदृढ राष्ट्रासाठी, मतदान करा” (#VoteforHealthynation) हा संदेश प्रिस्क्रीप्शनच्या चिटवर लिहत अनोखी मोहिम राबवत प्रत्येक घराघरात पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. रूग्णालयाच्या रूग्ण बाह्य विभागात एका बूथच्या माध्यमातून रूग्णालयातील कर्मचारी स्वंयसेवक बनून मतदानाच महत्व नागरीका, रूग्णांना विशद करतील.

या मोहिमेविषयी बोलताना झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे संचालक डाँ.राँय पाटणकर म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात मोठे लोकशाही असणारा देश आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला जो अधिकार मिळाला आहे तो प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. आपला अधिकार बजावून मतदानाचा टक्का वाढविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असून तुम्हाला अपेक्षित असलेला बदल घडविण्यासाठी तसेच देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. जसे रूग्णाला औषधोपचार आवश्यक आहे तसेच लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. चला तर आपल्यासह इतरांनाही लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून घेऊ या, मतदान करूया, सदृढ राष्ट्र घडवू या.

मतदान हा प्रत्येक सुजान भारतीय नागरीकाचा मुलभूत अधिकार आहे. आपल्या अधिकाराच महत्व हे आपल्याला मिळालेल्या नागरीकत्वाचा अविभाज्य घटक आहे. अनेक नागरिक आपल्या एका मताने काय फरक पडणार असा समज करून मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात. परंतू तुमचे एक मतही तितकेच बहुमूल्य आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने हा अधिकार बजावणे गरजेचे आहे, म्हणूनच