Loksabha Elections 2019: भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रात चार विद्यमान खासदारांना पक्षश्रेष्ठींचा दणका

Bjp Releases Second List Of 36 Candidates | | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Loksabha Elections 2019: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओदिशा, असम आणि मेघालय या राज्यांचा समावेश असलेली भारतीय जनता पक्ष (BJP) लोकसभा उमेदवार यादी शुक्रवारी (22 मार्च 2019) रात्री उशीरा जाहीर झाली. यादीत जाहीर झालेल्या नावानुसार जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुणे (Pune) येथून गिरीश बापट (Girish Bapat) , बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे.

भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनाही उमेदवारीची संधी 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 184 उमेदवारांची पहिली यादी भाजपने गुरुवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपची दुसरी यादीही जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनाही उमेदवारीची संधी मिळाली आहे. संबित पात्रा हे ओदिशा येथील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. (हेही वाचा, Loksabha Elections 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, लातूर मतदारसंघ उमेदवारांचा समावेश)

एएनआय ट्विट

चार नव्या चेहऱ्यांना संधी, चौघांचा पत्ता कट

दरम्यान, भाजपच्या दुसऱ्या यादीत चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे. तर, चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यात पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट झाला आहे. तर, जळगावमध्ये पक्ष नेते एकनाथ खडसे यांना धक्का देत पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन गटाच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.