Lok Sabha Election Results 2019: निकालापूर्वी शिवसेनेचा सावध पवित्रा, दुपारी 12 वाजेपर्यंत संयम राखण्याचा निर्णय

ठाणे शहरात शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर शिवसैनिकांनी काही ठिकाणी झळकवले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा सुरु आहे.

Shivsena (Photo Credits: PTI)

Lok Sabha Election Results 2019:  लोकसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (गुरुवार, 23 मे 2019) पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली आहे. मतमोजणी केंद्रावर EVM घेऊन येण्यासही सुरुवात झाली आहे. देशभरात उत्सुकता आहे. प्रसारमाध्यमांमधून खास करुन टीव्ही मीडिया वार्तांकनासाठी सज्ज झाला आहे. विविध पक्षांचे प्रवक्ते, प्रतिनिधी, राजकीय विश्लेषक टीव्ही चॅनलवर विश्लेषणासाठी ठाण मांडूण बसले आहेत. या पार्श्वभूमिवर एनडीएतील घटक पक्ष आणि भाजपचा सत्तासहभागी मित्र शिवसेना (Shiv Sena)  मात्र सावध पवित्रा घेताना दिसत आहे.

काय आहे शिवसेनेचा सावध पवित्रा?

महाराष्ट्रातील टीव्ही चॅनल्सनी निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यासाठी सकाळपासूनच सुरुवात केली आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते, प्रतिनिधी टीव्ही चॅनलवरती निवडणूक निकालाच्या विश्लेषणासाठी आले आहेत. दरम्यान, शिवसेनेने मात्र नेहमीपेक्षा हटके भूमिका घेत दुपारी 12 वाजेपर्यंत आपला प्रतिनिधी किंवा प्रवक्ता प्रसारमाध्यमांसमोर पाठवायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेने ही संयमाची भूमिका का घेतली असावी याबाबतचा तपशील अद्याप पुढे आला नाही. मात्र, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रसारमाध्यमांसमोर असताना शिवसेनेनेच ही भूमिका का घेतली असावी याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live News Updates: थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; जाणून घ्या लेस्टेस्ट अपडेट्स)

ठाण्यात बॅनरबाजी

दरम्यान, दुपारी 12 वाजेपर्यंत संयम बाळगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघात मात्र बॅनर झळकवले आहेत. ठाणे शहरात शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर शिवसैनिकांनी काही ठिकाणी झळकवले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा सुरु आहे.

Tags

BJP BJP Winning Candidates BJP Winning Seats in 2019 Congress Congress Winning Candidates Congress Winning Seats in 2019 Election Results 2019 India General Election Results 2019 General Elections 2019 Results Indian Lok Sabha Results 2019 List of BJP Winners List of Congress Winners Lok Sabha Election Results Lok Sabha Election Results 2019 Lok Sabha Elections 2019 Lok Sabha Elections 2019 Final Results Lok Sabha Elections 2019 Results Nagpur Lok Sabha Constituency Election Results 201 NCP Results of Election 2019 Results of Lok Sabha 2019 Results of Lok Sabha Elections 2019 Shivsena अपक्ष उमेदवार कॉंग्रेस कॉंग्रेस विजयी उमेदवार कॉंग्रेस विजयी उमेदवार यादी डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे बीजेपी भाजप भाजपा भाजपा विजयी उमेदवार भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष विजयी उमेदावार यादी महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019 लोकसभा निवडणूक निकाल 2019 वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी विजयी उमेदवार शिवसेना शिवसेना प्रवक्ता शिवसेना प्रवक्ते शिवसेना बॅनर शिवसेना विजयी उमेदवार शिवसेना विजयी उमेदवार यादी सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019 स्वाभिमानी शेतकरी संघटना