महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज वाढला, जाणून घ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांना किती टक्के मतं मिळाली?

त्या तुलनेत लोकसभा निवडणू 2019 मधील मतांच्या टक्केवारीवर नजर टाकता थोड्याफार फरकाने आपापली मतांची टक्केवारी कायम ठेवली आहे. अपवाद फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा.

Shiv Sena, BJP, NCP and Congress | (Photo credit: archived, modified, representative image)

Lok Sabha Election 2019 Vote Percentage in Maharashtra: लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र आणि देशभरात शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि एनडीएतील घटक पक्षांसाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. या निवडणुकीत देशातील जनतेने एनडीएच्या झोळीत भरभरुन दान टाकले. यात महाराष्ट्राचा विचार करता शिवसेना आणि भाजप आघाडीवर आहेत. 23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. या मतमोजणीनंतर मताधिक्यांचे विश्लेषन केले जात आहे. दरम्यान, मताधिक्याचा विचार करता राज्यात शिवसेनेला जोरदार फायदा होताना दिसतो आहे. टक्केवारीत बोलायचे तर मतांचा टक्का वाढण्यात शिवसेना पहिल्या क्रमांकावर, भाजप दुसऱ्या तर, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळाली.

लोकसभा निवडणूक 2014 च्या तूलनेत 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज चांगलाच वाढला आहे. शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत तब्बल तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. भाजपच्या मतांमध्येही वाढ झाली आहे. पण, 2014 च्या तुलनेत ही टक्केवारी फारशी मोठी नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीचा विचार करता धक्का बसला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये थेट 3 टक्क्यांची घट झाली आहे. वरवर पाहता तीन टक्के हा आकडा मोठा वटत नसला तरी, पक्ष आणि उमेदवारांच्या जय पराजयावर त्याचा मोठा परिणाम होत असतो.

दरम्यान, मिळालेल्या मतांची टक्केवारी ही युती आणि आघाडी अशा स्वरुपात करायची तरी, या तुलनेतही युतीचा वरचष्मा पाहायला मिळतो. भाजप अधिक शिवसेना अशी मतांची टक्केवारी एकत्र करता ती बेरीच 50 टक्क्यांच्या वर जाते. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अशी बेरीज करु पाहता ही टक्केवारी जवळपात 31 टक्क्यांपर्यंत पोहोचते.

विशेष म्हणजे राज्याच्या लोकसभा निवडणुक निकालात महत्त्वाची ठरलेल्या वंचित बजुजन आघाडी या तिसऱ्या पर्यायाकडे उल्लेखनीय नजरेने पाहायला हवे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात उतरु पाहात असलेल्या वंचित बहुजन आघाडीने चक्क 14 टक्के मते मिळवली आहे. वंचित बहुजन आघाडीने लढवलेल्या एकूण जागांपैकी सुमारे 8 जागांवर चांगली कामगिरी करत लक्षवेधी मते मिळवली आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अनंत गिते, राजू शेट्टी यांची कुणी घेतली विकेट? पाहा कोण ठरले महाराष्ट्राचे जायंट किलर)

मतांची टक्केवारी तुलना (आकडे टक्केवारीत)

(संदर्भ : निवडणूक आयोगाची आकडेवारी)

पक्ष       2019     2014

भाजप     27.59     27.56

शिवसेना   23.29     20.82

काँग्रेस     16.27     18.29

राष्ट्रवादी   15.52     16.12

बसपा      0.86           2.63

इतर पक्ष   14.55 टक्के    —

लोकसभा निवडणूक 2014 चा विचार करता भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना अनुक्रमे २७.८१ टक्के, १९.३५ टक्के, १७.९५ टक्के, १७.२४ टक्के मतं मिळाली होती. त्या तुलनेत लोकसभा निवडणू 2019 मधील मतांच्या टक्केवारीवर नजर टाकता थोड्याफार फरकाने आपापली मतांची टक्केवारी कायम ठेवली आहे. अपवाद फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा.