राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या पराभवाच्या दु:खात कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

इथे राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार जोर लावला होता. त्याला भाजपकडूनही आव्हान मिळाले होते. मात्र, एकूण जनमत आणि विविध चर्चा पाहता निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचे पारडे जड होते. मात्र अखेरच्या क्षणी जनमताने अखरे रणजितसिंह-नाईक-निंबाळकर यांच्या बाजून कौल दिला.

Representational Image (Photo Credits: ANI)

Lok Sabha Election Results 2019: माढा (Madha) लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय शिंदे (Sanjay Shinde ) हेच विजयी होतील अशी चर्चा होती. परंतू, इथे भाजपच्या रणजितसिंह-नाईक-निंबाळकर यांनी शिंदे यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. दरम्यान, पांडूरंग शिंदे (वय २५ रा. शिंदेवाडी, ता. माढा) या तरुणाने हा पराभव काहीस अधिकच जिव्हारी लाऊन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.पांडूरंग याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या पांडूरंग शिंदे या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, बार्शी पोलिसांनी पांडूरंग याचा जबाब नोंदवून घेत या घटनेची नोंद घेणे सुरु केले आहे. (हेही वाचा, मुंबई: नायर इस्पितळात त्रासाला कंटाळून रहिवाशी महिला डॉक्टरची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल)

माढा लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. इथे राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार जोर लावला होता. त्याला भाजपकडूनही आव्हान मिळाले होते. मात्र, एकूण जनमत आणि विविध चर्चा पाहता निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचे पारडे जड होते. मात्र अखेरच्या क्षणी जनमताने अखरे रणजितसिंह-नाईक-निंबाळकर यांच्या बाजून कौल दिला.