Lok Sabha Election 2024: वर्षा गायकवाड ह्या माझ्या छोट्या बहीण म्हणत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा गायकवाड ह्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा मतदार आहे आणि वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे.

Varsha Gaikwad (PC - Facebook)

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंना यांना वर्षा गायकवाडांना मतदान करावं लागणार आहे. उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान हे करणार आहे. शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा गायकवाड ह्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा मतदार आहे आणि वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे. इंडिया अलायन्स ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे. (हेही वाचा -  Sharad Pawar Visits Pandharpur Vitthal Rukmini Mandir: शरद पवार पोहचले पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात; घेतले मनोभावे दर्शन (Watch Video))

वर्षा गायकवाड ह्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. मुंबईतल्या साऊथ सेंट्रलच्या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समोरासमोर आले होते. सुरुवातीला वर्षा गायकवाड ह्या साऊथ सेंट्रल जागेवरुन निडणूक लढवणार होत्या. परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणाहून आता वर्षा गायकवाड यांना उभे केले असून महाविकास आघाडीकडून ही जागा जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहे.

वर्षा गायकवाड ह्या माझ्या छोट्या बहीण आहेत. आम्ही त्यांना आमचा खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहोत. हुकूमशाहीचं सरकार हटवण्यासाठी आम्ही एकजुटीने लढणार आहोत, असं ठाकरे म्हणाले. ही जागा जिंकून येण्यासाठी आम्ही सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याचे देखी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचा सामना हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif