Lok Sabha Election 2024 Phase 5: मुंबई, ठाणे, नाशिक, रायबरेलीसह ४९ जागांवर आज ५व्या टप्प्यात मतदान, 'या' दिग्गजांचं भवितव्य पणाला

भाजप आणि महाविकास आघाडीच्या नामवंत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Voting | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha election 2024 phase 5: आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) पाचव्या टप्प्यासाठी राज्यातील काही भागांसह देशात मतदान पार पडणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या नामवंत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याशिवाय या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या भवितव्याचाही या टप्प्यात निर्णय होणार आहे. रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवरही मतदान होणार आहे. जिथून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी(Smriti Irani) रिंगणात उतरत आहेत.

राज्यात 13 जागांवर मतदान

दरमयान, आज राज्यातील 13 जागामवर मतदान होत आहे. व्यतिरिक्त उत्तर प्रदेश मधील 14 जागांवर मतदान होत आहे. पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, झारखंडमधील 3, ओडिशातील 5, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे. त्यापैकी 40 हून अधिक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 4.26 कोटी महिला मतदारांसह 8.95 कोटींहून अधिक भारतीय नागरिक मतदान करणार आहेत. 94,732 मतदान केंद्रांवर 9.47 लाख मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.