Lockdown in Karnataka: कर्नाटक मध्ये पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन लागू, राज्यातील नागरिकांना कठोर नियमांचे पालन करावे लागणार
मुख्यमंत्री बीएस. येदियुरप्पा यांनी सोमवारी अशी घोषणा केली आहे की, राज्यात दिल्लीत आणि महाराष्ट्रातून अधिक कोरोनाचे संक्रमण होत आहे.
Lockdown in Karnataka: कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्नाटकात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बीएस. येदियुरप्पा यांनी सोमवारी अशी घोषणा केली आहे की, राज्यात दिल्लीत आणि महाराष्ट्रातून अधिक कोरोनाचे संक्रमण होत आहे. अशातच 14 दिवसांचा कर्फ्यू लावला जाणार आहे. त्याचसोबत नागरिकांना आता कठोर नियमांचे पालन करावे लागणार असून ते उद्या रात्री पासून लागू केले जाणार आहेत. तसेच सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवासुविधांसाठी परवानगी दिली गेली आहे. सकाळी 10 नंतर सर्व दुकाने बंद ठेवली जातील. फक्त बांधकाम, वनकाम आणि शेती संबंधित क्षेत्रांना परवानगी असेल. सार्वजनिक वाहने सुद्धा बंद असणार आहेत.
कोरोनाची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी पुढे असे म्हटले आहे की, अधिकाऱ्यांकडे कठोर नियम लागू करण्याचे अधिकार असणार आहेत. जेथे आधीपासूनच कर्फ्यू लावण्यात आला आहे तेथे तो त्याच पद्धतीने असणार आहे. कोरोनच्या संकटकाळात कर्नाटकातील परिस्थिती अत्यंत वाईट होत चालली आहे. येथे दररोज 10 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद केली जात आहे. सध्याच्या घडीला राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2.62 लाखांवर पोहचली आहे.(COVID 19 In India: शाकाहारी, धुम्रपान करणार्यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कमी याचा थेट संबंध नसल्याचं CSIRचं स्पष्टीकरण)
Tweet:
दरम्यान, राज्यात येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना शासकीय रुग्णालयात कोरोनाची मोफत लस दिली जाणार आहे. तर 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांना आधीपासूनच ती फ्री मध्ये देण्यात येत आहे. तर कर्नाटकासह दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान मध्ये 15 दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर युपी, मध्य प्रदेश मधील काही शहरात कर्फ्यू किंवा विकेंड लॉकडाउन लागू केला गेला आहे.