Mumbai Weather Forecast: मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज; Yellow Alert जारी
तसेच मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
Mumbai Weather Forecast: मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) मध्ये गुरुवारी हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. याशिवाय या भागात भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40kmph) येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईचे तापमान 29 अंश सेल्सिअस होते तर आर्द्रता 75 टक्के होती. गुरुवारी मुंबईचे तापमान 26.6 अंश सेल्सिअस होते तर आर्द्रता 82 टक्के होती. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे तर मराठवाड्यात नांदेड, लातूरमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, मुंबईतील AQI सध्या 'समाधानकारक' श्रेणीत आहे, ज्याचे रीडिंग 58 आहे. SAFAR ने श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या लोकांना घराबाहेर दीर्घकाळ किंवा जास्त श्रम कमी करण्याचा आणि अधिक विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. धूळ आणि प्रदुषित कणांमुळे सरकारकडून लोकांना बाहेर जाताना मास्क घालण्याचा सल्ला दिला जात आहे. (हेही वाचा - Mumbai Vehicle Parking App: काय सांगता? मुंबई शहरात पोहोचण्यापूर्वीच मिळणार पार्किंगसाठी जागा? ऑनलाईन स्लॉट बुकींग)
दरम्यान, 0 आणि 50 दरम्यानचा AQI 'चांगला' मानला जातो, तर 51 ते 100 हा 'समाधानकारक', 101 ते 200 'मध्यम', 201 ते 300 'खराब', 301 ते 400 'अत्यंत खराब', आणि 401 ते 500 'गंभीर' एक्यूआय मानला जातो. (हेही वाचा - Summer Special Trains For Konkan: मध्य रेल्वेच्या कोकण विभागात अजून 26 नव्या उन्हाळी विशेष गाड्या; आजपासून बुकिंग सुरू)
तथापी, ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारी वातावरण कोरडे असेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.