IPL Auction 2025 Live

Leopards in Nashik: वन क्षेत्रपाल जखमी, मोठ्या थरारानंतर नाशिक शहरातील नरसिंह नगर परिसरात बिबट्या जेरबंद

तीन तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद (Leopards Seized in Nashik) करण्यास वन विभागाला यश आले.

Leopard | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: pixabay)

वन्य प्राण्यांचे नागरी परिसरात शिरणे आता नवे राहिले नाही. थोड्याफार दिवसांच्या फरकाने कुठे ना कुठे वन्य प्राणी शिरल्याचे पाहायला मिळते. नाशिक (Nashik) शहरातही अशीच घटना घडली. नाशिक शहरातील नरसिंह नगर (Narasimha Nagar) परिसरात आज (18 एप्रिल) सकाळी नागरिकांना बिबट्या (Leopards) दिसला. तीन तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद (Leopards Seized in Nashik) करण्यास वन विभागाला यश आले. बिबट्याचे दर्शन होताच वन विभागाला त्वरीत कल्पना देण्यात आली. त्यानंतर सुरु झाला बिबट्याला पकडण्याचा थरार. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. विवेक भदाणे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते वन विभागात क्षेत्रपाल आहेत. बिबट्याने पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले.

बिबट्याला पकडण्यासाठी भुलीचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न आला. पहिल्या प्रयत्न अयशस्वी झाल्याने दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. दुसरे इंजेक्सन बिबट्याला बरोबर लागले. त्यांचा परिणामही काहीच वेळात पाहायला मिळाला. परंतू, तोपर्यंत बिबट्याने वनविभाग, पोलीस दल आणि इतरांना चांगलेच कामाला लावले. बिबट्या नागरी वस्तीत असल्यामुळे त्याला जेरबंद करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. बिबट्या पार्कींग, घराचे जिने आणि इतर ठिकाणी घुसत होता. त्यामुळे त्याला जेरबंद करत असताना नागरिकांच्या प्राणावर बेतण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व काळजी घेऊनच बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले जात होते. अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.

नाशिक शहरातील नरसिंह नगर परिसरात अक्षरधाम सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर बिबट्याने प्रवेश केला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला ही संधी चालून आली. या संधीचा फायदा घेत बिबट्याला इंजक्शन देऊ बेशुद्ध करण्यात आले. (हेही वाचा, Sangli Leopard: सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरात बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास)

दरम्यान, नाशिक शहरात बिबट्या दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही नाशिक शहरातील नरसिंह नगर, आनंदवली परिसरात दोन ते तीन वेळा बिबट्याचे दर्शन झाले होते. त्याच प्रमाणे आजही बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला पाहताच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वन विभागाचे पथक बिबट्याला जेरबंद करण्यसाठी पोहोचताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. बघ्यांची गर्दी हा सुद्धा बिबट्याला पकडताना एक मोठ्या प्रमाणावर येत असलेला अडथळाच होता.