Leopard Found in Mahavitaran Office: महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; राजगुरुनगर येथील घटना (Watch Video)

Photo Credit- Pixabay

Leopard Found in Mahavitaran Office: राजगुरुनगरमध्ये बिबट्या थेट महावितरण कार्यालयात शिरल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं (Pune News) होतं. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला थेट महावितरण कार्यालयात कोंडलं आणि बाहेर धाव घेतली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रणाणावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा:Leopard Spotted in Katraj Ghat: दिवेघाट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता कात्रज घाटात दिसला बिबट्या (Watch Video) )

व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

मागील पाच दिवसांपासून बिबट्या मादीसह बछडे महावितरण कार्यालगत दिसुन आले होते. या घटनेवेळी महावितरण कार्यलयात कर्मचारी त्यांचे काम करत होते. कार्यालयात बिबट्या शिरल्यामुळे कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घामु फुटला होता. जीव वाचवत कुठे पळावे अशी त्यांची अवस्था झाली होती. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे घटनेची चर्चा सकाळपासून सोशल मीडियावर सुरू झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif