पालेभाज्या महागल्या, 10 रुपयांच्या जुडीने गाठला 30 रुपयांचा पल्ला

पालेभाज्यांच्या आधीच्या दराच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, पालेभाजीची जुडी 30 रुपयांची झाली आहे.

Leaf Vegetables (Photo Credits: Wiki Commons)

महागाईचा दिवसेंदिवस डोकं वर काढत असताना आता पेट्रोल, डिझेल आणि फळभाज्यानंतर आता पालेभाज्याही महागल्या आहेत. राज्यातील तापमानातील वाढता पारा आणि ठिकाणी निर्माण झालेली दुष्काळ स्थिती चा परिणाम पालेभाज्यांच्या उत्पादनावर झालेला आहे. पालेभाज्यांच्या आधीच्या दराच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, पालेभाजीची जुडी 30 रुपयांची झाली आहे.

पावसाला हवी तशी सुरुवात झाली नसून पाण्याच्या कमतरेतमुळे पुण्याहून येणा-या पालेभाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सध्या नाशिकवरुनच मुंबईकरांना पालेभाज्यांचा पुरवठा होत आहे. मात्र त्यांचेही प्रमाण कमी असल्याने ही भाववाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा पातीचा भाव 20 ते 30 रु. जुडी, मेथी व मुळा 25 ते 30 रु. जुडी, पालक आठ ते 10 रु. आणि शेपू 20 ते 25 रुपये जुडीवर पोहोचला आहे.

दरम्यान, कोथिंबीरची जुडी तर 30 ते 40 रुपयांवर गेली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर 50 ते 60 रुपयांना विकत घ्यावी लागत असून, 10 रुपयांना 10 काड्या या हिशोबाने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात इतर पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत. कांदा पात, मुळा आणि शेपूची जुडी 30 ते 40 रुपयांना विकली जात आहे, तर मेथीची जुडी 40 ते 50 रुपयांवर पोहोचली आहे.

तुरडाळीचे भाव चक्क 100 रुपांच्या घरात, सामान्य नागरिकांना बसणार फटका

इतक्या महाग पालेभाज्या घेणे गृहिणींना परवडत नसल्याने व्यापारीही जुड्या सोडून भाज्या विकत आहेत. आता पावसाळा सुरू होऊन नवीन लागवड होईपर्यंत हे भाव वाढतच राहणार असल्याचे सांगण्यात येते .