Cyclone Nisarga: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट, निसर्ग चक्रीवादळ आपत्तीतील नुकसान भरपाईबाबत चर्चा
त्यामुळे नुकसानग्रस्तांना मिळणारी मदत तातडीने द्यावी. ही रक्कम रोख स्वरुपाची असावी. या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत सुरु व्हायला हवा असे सांगतानाच. नुकसान झालेल्या ठिकाणी घरांच्या पत्र्याचा काळाबाजार सुरु झाला असून तो तत्काळ थांबवला जावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga ) संकटाचा तडाखा बसलेल्या भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबई येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही भेट झाली. उद्योग मंत्री सुभाष देसाई सुद्धा या बैठकीस उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत फडणवीस यांनी भेटीतील तपशील सांगितला.
राज्यावर इतके मोठे संकट येऊनही हे सरकार जमिनीवर काम करताना दिसत नाही. त्यामुळे आता तरी या सरकारने काही भरीव कामगिरी करावी, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, निसर्ग चक्रीवादळ संकटानुंतर मी कोकणातील परिस्थितीचा दौरा केला. प्रविण दरेकर, रविंद्र चव्हाण यांनीही या परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात आम्हाला जे सत्य दिसले ते आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर सांगितले. (हेही वाचा, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोविड-19 ची लागण झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला)
एएनआय ट्विट
ट्विट
ट्विट
नुकसानग्रस्तांना आतापर्यंत एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मिळणारी मदत तातडीने द्यावी. ही रक्कम रोख स्वरुपाची असावी. या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत सुरु व्हायला हवा असे सांगतानाच. नुकसान झालेल्या ठिकाणी घरांच्या पत्र्याचा काळाबाजार सुरु झाला असून तो तत्काळ थांबवला जावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.