अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींवरील अत्याचारांविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइनचा प्रारंभ
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज अत्याचारांविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन (NHAA) सुरू केली. हेल्पलाइन आता संपूर्ण देशभरात टोल-फ्री क्रमांक “14566” वर हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत चोवीस तास उपलब्ध आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज अत्याचारांविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन (NHAA) सुरू केली. हेल्पलाइन आता संपूर्ण देशभरात टोल-फ्री क्रमांक “14566” वर हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत चोवीस तास उपलब्ध आहे.
हेल्पलाइन क्रमांक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) [PoA] कायदा, 1989 ची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करेल आणि देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाइल किंवा लँड लाइन नंबरवरून व्हॉईस कॉल / VOIP करून संपर्क करता येऊ शकतो. अत्याचार प्रतिबंध कायदा अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) सदस्यांवरील अत्याचार रोखण्याच्या प्रमुख उद्देशाने लागू करण्यात आला होता.
हेल्पलाइनबद्दल मूलभूत माहिती :
- टोल फ्री सेवा.
- देशभरातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या मोबाइल किंवा लँड लाइन नंबरवरून "14566" वर व्हॉइस कॉल /VOIP करून संपर्क करता येऊ शकतो.
- सेवांची उपलब्धता : चोवीस तास
- सेवा हिंदी, इंग्रजी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असतील
- मोबाईल ऍप्लिकेशन देखील उपलब्ध आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Mumbai Metro Line 3 Phase 2A Inauguration: बीकेसी-वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेची प्रतिक्षा संपली; 10 मे पासून नागरिकांच्या सेवेत
Advertisement
Advertisement
Advertisement