Latur Flour Mill Fire: निलंगा येथील फ्लोअर मिलला आगीचा तांडव, कोट्यावधी रुपयाचा माल जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही
या भीषण आगीत (Fire) कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे
Latur Flour Mill Fire: लातूर (Latur) शहरातील निलंगा येथील अपर्णा फ्लोअर मिलला भीषण आग लागली. या भीषण आगीत (Fire) कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे सोबत भरपूर मशीन आगीत जळल्या आहेत. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. या मील मधील मैदा आणि रव्याने भरलेल्या हजारो पोते जळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रात्री अचानक आग लागल्याची माहिती मिळाली. अपर्णा फ्लोअर मिल ही निलंगा शहातील मुख्य रस्त्यावर आहे. आग लागली त्यावेळी काही कामगार तेथे उपस्थित होते. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. खूप उशिरानंतर आग नियत्रंणात आली परंतु मिल मधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
आगीची माहिती किल्लारी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आली. या मिल मधील गहू, मैदा, रवा इत्यांदीच्या हजारो पोत्यानी भरलेले पीठ जळून खाक झाली होती. कोट्यावधी रुपयांचा नुकसान या आगीत झाले. या आगी मुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.