नाशिक: कसारा- इगतपुरी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्येही पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत
मोखाडा - त्र्यंबकेश्वर ही वाहतूक ठप्प झाली तर रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने कसारा -इगतपुरी रेल्वे सेवा देखील ठप्प झाली आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर सह महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तर पालघरमध्येही पावसाला चांगलाच जोर असल्याने जव्हार-मोखाडा भागातील नद्यांना पूर आला आहे. जव्हार-मोखाड्यातील (Mokhada) रस्तेही पाण्याखाली गेले असून मोखाडा येथे रस्ता खचल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मोखाडा - त्र्यंबकेश्वर ही वाहतूक ठप्प झाली तर रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने कसारा -इगतपुरी रेल्वे सेवा देखील ठप्प झाली आहे.
नाशिकमध्ये पहाटेपासून दमदार पाऊस असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात पाणीच पाणी झाले आहे. गोदावरी नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याने नाशिकमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिक मध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ANI Tweet:
पालघर मधून नाशिककडे जाणाऱ्या मोरचुंडी पुलाच्या आजूबाजुचा रस्ता देखील खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाल्याने मोखाड्यातील ग्रामस्थांचा नाशिकशी संपर्क तुटला आहे.