Lalbaugcha Raja 2024: 'लालबागच्या राजा' च्या चरणी मंडळाचे मानद सचिव 'सुधीर साळवी आमदार होऊ दे' ची चिठ्ठी; शिवडी विधानसभेसाठी नाव चर्चेत

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्याचे संकेत दिले आहेत.

Sudhir Salvi | X @ @MRHITESHJAGTAP

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Elections)  आता अगदीच दीड दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशामध्ये इच्छुकांची पक्षात तिकीटासाठी फिल्डिंग लावणं सुरू झालं आहे. आज लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja 2024) चरणी देखील याच पार्श्वभूमीवर एक चिठ्ठी दिसली आहे. निनावी भाविकाने टाकलेल्या चिठ्ठीमध्ये 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 2024 आमदार सुधिर (भाऊ) साळवी' असं लिहलेली चिठ्ठी टाकली आहे. दरम्यान सुधीर साळवी (Sudhir Salvi) हे लालबागच्या राजाच्या मंडळाचे मानद सचिव आहेत.

लालबागच्या राजाची ख्याती ही 'नवसाला पावणारा' अशी आहे. त्यामुळे सामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी हमखास त्याच्या दर्शनाला येतात. मनातील इच्छा बोलून दाखवतात आणि दरवर्षी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडायला देखील स्वतंत्र रांगेतून भाविक येतात. यंदा गणेशोत्सवापूर्वी सुधीर साळवी यांना पितृशोक झाला आहे.

ठाकरे गटाकडून मिळणार सुधीर साळवींना उमेदवारी?

सुधीर साळवी आणि त्यांचे वडील सीताराम (दाजी) साळवी हे जुने शिवसैनिक आहेत. सुधीर साळवींकडे उद्धव ठाकरेंनी शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून जबाबदारी सोपावली होती. आता सुधीर साळवी थेट आमदारकीसाठी निवडणूकीच्या रिंगणात येण्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आता सुधीर साळवी की अजय चौधरी यांना शिवडीमधून तिकीट देणार याची चर्चा रंगली आहे. गणेशोत्सवामध्ये यंदा पहिल्याच दिवशी ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले असता परत जात असताना त्यांनी मंडप परिसरातच सुधीर साळवींचं उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी थांबून सांत्वन केले होते.

दरम्यान मनसे कडून शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. 27 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल संपत आहे त्यामुळे दिवाळी नंतर राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्याचे संकेत दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif