Kripashankar Singh Demand: उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करावा, कृपाशंकर सिंह यांची मुख्यमंत्री योगींना विनंती
सिंह यांनी मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्हाला माहिती आहे की, गेल्या 50 वर्षांपासून मी महाराष्ट्रात राहत आहे आणि माझे उत्तर प्रदेशमध्ये विशेषत: पूर्वांचलमध्ये विशेष नाते आहे.
महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (BJP) उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करण्याची विनंती केली. सिंह यांनी मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्हाला माहिती आहे की, गेल्या 50 वर्षांपासून मी महाराष्ट्रात राहत आहे आणि माझे उत्तर प्रदेशमध्ये विशेषत: पूर्वांचलमध्ये विशेष नाते आहे. या 50 वर्षांच्या कार्यकाळात मला असे आढळून आले की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मोठा भाग योग्य नोकऱ्या शोधण्यासाठी महाराष्ट्रात स्थलांतरित होतो.
सिंग पुढे लिहितात की, आपल्या 50 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पाहिले की जेव्हा विद्यार्थी महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. इतकेच नाही तर राज्य सरकार किंवा महामंडळांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत ज्यांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. हेही वाचा Pune: हीच माझ्या कामाची पावती! मनसे नेते निलेश माझिरे यांच्या घरवापसीनंतर वसंत मोरेंचे ट्विट चर्चेत
भाजप नेत्याला विनंती केली की माझ्या मते, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मराठीला पर्यायी भाषा बनवल्यास महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळू शकेल. वरील बाबी लक्षात घेता, उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करण्याची मी तुम्हाला विनंती करतो.