Photo Credit - Twitter

SSC Exam : दहावीचा (SSC Exam) टप्पा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. परिक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात. चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. कोणाला सीए, डॉक्टर, इंजिनिअर बनायचं असतं. कोणाचं बीझनसमॅन बनण्याचं स्वप्न असतं. मात्र, हे सर्व चांगल्या अभ्यासाच्या जोरावर शक्य असतं. पण नाशिकमध्ये (Nashik) दहावितल्या एका विद्यार्थ्याच्या कारनाम्याने शाळा प्रशासन हादरून गेल आहे. हिंदी भाषिक शाळेत एक विद्यार्थी परीक्षेला येताना चक्क कोयता (Koyata ) घेऊन आला होता.(हेही वाचा :Maharashtra SSC, HSC Exam 2024 Dates: राज्यातील दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा )

नेहमी प्रमाणे सर्व विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी शाळेत आले होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या बॅग परीक्षा हॉल बाहेर ठेवल्या होत्या. नेमकं त्यावेळी या परीक्षा केंद्रावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला एक बॅग संसायस्पद वाटली. त्याने ती बॅग चेक केली असता त्यात कोयता मिळून आला. याची माहिती नंतर सातपूर पोलिसांना देण्यात आली. परीक्षा संपल्यानंतर संशयास्पद बॅग उचलणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. कोयता कुठून आला? कोयता कोणी दिला ? आशा अनेक प्रश्नाच्या उत्तरांचा शोध पोलीस घेत आहेत.(हेही वाचा :SSC Exam Calendar 2024-25: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून संभाव्य वेळापत्रक जारी; ssc.nic.in वर पहा परीक्षांच्या तारखा )

सध्या लहान मुलांकडेही मोबाईल फोन असल्याने ही मुले गुन्हेगारीकडे जासते ओढली जात आहेत. यात तलवारीने केक कापणे असो, किंवा हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असो. असे व्हीडिओ पाहून अल्पवयीन मुलांच्या मनात आपणही असंच करावं अशी भावना उत्पन्न होतं असते. काहीवेळी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.