Kolhapur News: नवरदेवाकडून घोड्यावर बसून हवेत गोळीबार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचे शुटींगही करण्यात आले. आता या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही कथीत घटना आणि व्हिडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.

Viral Videos | (PC - Twitter)

लग्न हा अनेकांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. अशा या खास क्षणी काही जण मन स्थिर ठेऊन कृती करतात. काही मात्र आनंदाने इतके भांबावून जातात की आपण काय करतो आहोत याचे भानच त्यांना उरत नाही. कोल्हापूरातून अशीच एक घटना पुढे येत आहे. एका नवरदेवाने वरातीदरम्यान (Viral Videos of Wedding) आनंदाच्या भरात घोड्यावर बसलेला असतानाच बंदुकीतून हवेत बार ( Kolhapur Firing) काढले. या घटनेचे शुटींगही करण्यात आले. आता या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही कथीत घटना आणि व्हिडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.

प्राप्त माहितीनुसार, सदर घटना 15 डिसेंबर रोजी घडली आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, लग्नाची वरात निघाली आहे. नवरदे घोड्यावर बसला आहे. डिजे सुरु आहे. डिजेच्या तालावर झिंगलेलेल वऱ्हाडी नाचत आहेत. डिजेवाल्याने 'यारोने मेरे वास्ते क्या कुछ नही किया' हे गाणे लावले आहे. याच गाण्यावर तल्लीन होऊन मंडळी नाचत आहेत. दरम्यान, नवरदेव बंदुक काढतो आणि त्याच बंदुकीतून हवेत गोळीबार करतो. ही घटना कोणीतरी कॅमेऱ्यात कैद करते. (हेही वाचा, Kolhapur Black Magic: मुलींच्या फोटोंवर हळद-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू; वशीकरण, करणीच्या नावाखाली कोल्हापूरमध्ये अघोरी प्रकार)

ट्विट

आनंदाच्या भरात भान हरवून नवरदेवाने गोळीबर (हवेत) केला खरा. परंतू, त्याच वेळी कोणीतरी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला. ज्यामुळे आता नवरदेव अडचणीत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामुळे नवरदेव अजयकुमार पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.