Ruturaj Patil Tested Positive for Covid-19: कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना व्हायरसची लागण
याची माहिती खुद्द ऋतुराज यांनी ट्विट करत दिली आहे.
कोल्हापूरचे काँग्रेस आमदार (Kolhapur Congress MLA) ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याची माहिती स्वत: ऋतुराज यांनी ट्विट करत दिली आहे. ऋतुराज यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून कोल्हापूरातील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. "माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती," असे ऋतुराज पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
कोरोना संकटात विविध कामानिमित्त ऋतुराज विविध मतदारसंघात फिरत होते. त्यामुळे कामाच्या दरम्यान संपर्कात आलेल्या लोकांद्वारे कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. ऋतुराज पाटील हे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. कोरोना संकटात त्यांनी शेअर केलेला 'त्याला_काय_हुतंय??' हा व्हिडिओ हिट झाला. या व्हिडिओतून त्यांनी 'आता आपण प्रत्येकजण कोरोना योद्धा होऊया,' असं आवाहन कोल्हापूरकरांना केलं होतं.
Ruturaj Patil Tweet:
यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मात्र योग्य उपचारानंतर सर्वांना कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.