Kokan Weather forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

काल रात्री पासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे.कोकमत आज मुसळधार पवसास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Kokan Weather Prediction, July22 : कोकणात आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्री पासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे.कोकणात आज मुसळधार पवसास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर अध्याप ही रत्नागिरीत कायम असून पुढच्या 24 तासात IMD मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain)पडत आहे. कोकणात या सतत पडणाऱ्या पावसामुळं नद्या धोक्याची पातळी वरुण वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीव[Poll ID="null" title="undefined"] विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पानी साचले आहेत.मात्र कोकणात घाटमाथ्यावर आज ही अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.आता कोकणात उद्याचे वातावरण कसे असतील यासाठी हवामान विभागाने कोकण उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा:  Mumbai Rain Alert: मुंबईत मुसळधार पावसाच्या हजेरीने जनजीवन विस्खळीत; आजही जोरदार बरसण्याचा अंदाज

कोकणात उद्याचे हवामान कसे?

कोकणस मुंबईत सुद्धा पावसाचा हाहाकार चालू आहे.मुंबईमध्ये पावसाने जोर धरला असून अनेक उपनगरीय भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) X वर पोस्ट करत नागरिकांना पाणी साचलेल्या भागाची माहिती दिली आहे. डी. एन. नगर येथील अंधेरी भुयारी मार्गाजवळ 2 फूट पाणी साचल्याने सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील दक्षिणेकडील वाहतूक गोखले पुलामार्गे, तर उत्तरेकडील वाहतूक ठाकरे पुलामार्गे वळविण्यात आली आहे. याशिवाय, खार भुयारी मार्गाजवळ 1 ते 1.5 फूट पाणी साचल्यामुळे खार भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सदर वाहतूक लिंकिंग रोडने वळविण्यात आली आहे.