Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या अहवामन अंदाज!

कोकण किनापट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Kokan Weather Prediction, July 15 : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज 15 जुलै रोजी कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. कोकण किनापट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. IMD च्या अंदाजानुसार, 14 ते 16 जुलै या कालावधीत कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात एकाकी अत्यंत मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. IMD ने पुढे सांगितले आहे मान्सूनच्या सरी येणाऱ्या काही दिवसात अजून वाढू शकतात. कोकणात जगबुडी नदीसोबतच नारंगी नदीला देखील पूर आला आहे. पुराचं पाणी रस्त्यावर येत असल्याने खेड-दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन तासांपासून खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.अशामध्ये कोकणात आता पुढचे दोन दिवस महत्वाचे आहेत. हवामान खात्याने कोकणात अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आता कोकणचे उद्याचे हवामान कसे असतील ह्यासाठी हवामान विभागने कोकणातील उद्याचे हवामान ह्याच अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Prediction For Tomorrow: मुंबई मध्ये उद्याचे हवामान कसे असणार? जाणून घ्या पावसाचा अंदाज

कोकणात उद्याचे हवामान कसे?

प्रादेशिक हवामान विभागाने (RMC) रेड अलर्ट जारी केल्यामुळे महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये रविवार, 14 जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे."काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वेगळ्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे," RMC ने सांगितले.तर ठाणे, रायगड आणि पुणेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबई आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर 15 जुलैला पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि परभणीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.विदर्भातील बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, 15 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.