Sanjay Raut Tweet: किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा मिल्खा सिंगपेक्षाही जोरात पळत आहेत, संजय राऊतांचे ट्विट चर्चेत
सेव्ह आयएनएस विक्रांत (Save INS Vikrant) मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
सेव्ह आयएनएस विक्रांत (Save INS Vikrant) मोहिमेच्या नावाखाली भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,सोमय्या बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमय्या भाग’, असे राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना किरीट सोमय्या यांचे वकील, अधिवक्ता हृषिकेश मुंदरगी यांनी सांगितले की,‘काल दुपारी उशिरा आम्हाला नोटीस मिळाली. तर आज FIR ची कॉपी देण्यात आली.
पण किरीट सोमय्या त्यांच्या पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीत आहेत, तर नील सोमय्या हे देखील त्यांच्या कामासाठी बाहेर असल्याने ते आज हजर राहू शकत नाहीत. बुधवार नंतर सोमय्या हजर राहण्यास तयार आहेत, कायदेशीर लढाई कायदेशीर रित्याच लढवू.’ तसेच सोमय्यांच्या वकिलाकडून अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला असून, येत्या 11 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.