Mumbai Suicide Case: मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याने केरळमधील तरुणाचा मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांना कळताच वाचवला जीव

नुकतीच एक मुंबईतील आत्महत्या (Mumbai Suicide Case) करण्याचा प्रयत्न करणारी घटना समोर आली आहे. योग्य वेळेत पोलीसांच्या (Mumbai Police) कर्तव्यदक्षतेमुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत.

Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात आत्महत्येचे (Suicide) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतीच एक मुंबईतील आत्महत्या (Mumbai Suicide Case) करण्याचा प्रयत्न करणारी घटना समोर आली आहे. योग्य वेळेत पोलीसांच्या (Mumbai Police) कर्तव्यदक्षतेमुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत.  महाराष्ट्राची राजधानी (The capital of Maharashtra) मुंबईत एका व्यक्तीने ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून आत्महत्या करण्याचे ट्विट केले होते. त्याने हे पाऊल उचलण्यापूर्वीच पोलिसांच्या सायबर सेलने (Cyber ​​cell) सोशल मीडियाच्या मदतीने त्या व्यक्तीला वाचवले. सायबर पोलीस स्टेशनला (Cyber ​​Police Station) एक तात्काळ सूचना मिळाली होती की मानसिक तणावामुळे ग्रस्त एक तरुण ट्विटरवर आत्महत्या करण्याबद्दल बोलत आहे. शनिवारी सकाळी एका पत्रकारानेही ही माहिती सायबर पोलिसांना व्हॉट्सअॅपवर दिली होती. यानंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला.

पोलिसांना अशी माहिती मिळाली की 30 वर्षीय तरुणाने ट्विटरवर सांगितले की त्याला आपले जीवन संपवायचे आहे. परंतु या तरुणाने कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वीच पोलिसांनी मुंबईच्या दादर येथील हॉटेलमधून त्याची सुटका केली.  संजय गोविलकर या पोलीस पथकाचे नेतृत्व करत होते. घटनास्थळी पोहोचल्यावर निरीक्षक आणि हॉटेल मॅनेजरने हॉटेलची खोली उघडली तेव्हा हा तरुण चाकू घेऊन खोलीच्या आत उपस्थित होता. दुसरीकडे हॉटेल मॅनेजरने त्या तरुणाची खोली डुप्लीकेट चावीने उघडली होती. त्वरित कारवाई करत पोलिसांनी त्या तरुणाला पकडले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत युवकाने सांगितले की तो केरळचा रहिवासी आहे. तसेच तो डिप्लोमाचा विद्यार्थी आहे. तरुणाने सांगितले की त्याच्या मैत्रिणीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. म्हणूनच तो डिप्रेशनमध्ये होता. पोलिसांनी सांगितले की, हा तरुण शुक्रवारी हॉटेलमध्ये घुसला होता. या तरुणाला तातडीने मानसिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जेथे त्याचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात आले.

पोलीस आणि नागरिकांनी अशा परिस्थितीत आधीच अनेकांचे जीव वाचवले आहेत. जेव्हा त्यांना सोशल मीडियाद्वारे कळले., वेळेच्या अभावामुळे अनेक घटनांमध्ये जीव वाचवता आले नाहीत. तेव्हापासून सायबर सेल अशा बाबींमध्ये खूप लक्ष देते आहे. अशा घटना याआधीही घडल्या आहेत. सोशल मीडियावर आत्महत्येची करत असल्याची कबुली देत अनेक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मानसिक त्रासामुले आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.