Maharashtra Rain Update: अतिवृष्टीदरम्यान पाण्याची पातळी मोजण्यासाठी KDMC ने 10 ठिकाणी बसवले सेन्सर

जिथे पाण्याच्या पातळीचे चोवीस तास निरीक्षण केले जाते.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) अतिवृष्टीदरम्यान पाण्याची पातळी (Water level) धोकादायक पातळीवर पोहोचल्यावर नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यासाठी 10 ठिकाणी सेन्सर्स (Sensors) बसवले आहेत. हे सेन्सर्स महापालिकेच्या स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरला (Smart City Operations Center) जोडलेले आहेत. जिथे पाण्याच्या पातळीचे चोवीस तास निरीक्षण केले जाते.  केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी म्हणाले की, पाण्याची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचल्यानंतर केंद्राला अलर्ट केले जाते. त्यानंतर नागरी संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन पथक नागरिकांना सतर्क करण्यासाठी कारवाईचे आदेश देऊ शकते किंवा आवश्यकतेनुसार इतर उपाययोजना करू शकते.

ते म्हणाले की, 10 ठराविक ठिकाणी सेन्सर बसवण्यात आले आहेत. जेथे पावसानंतर अनेकदा पूर येतो. कोणतीही आपत्ती किंवा पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कदाचित पहिल्यांदाच महापालिका क्षेत्रात ही नवीन यंत्रणा बसवण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला. याशिवाय विविध भागात विशेषतः संवेदनशील ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती संबंधित अधिकारी देतील. हेही वाचा Palghar: खत विक्रीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी 2 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागात दणका दिला आहे.  राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नैऋत्य मान्सून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) याची घोषणा केली आणि सांगितले की पुढील 3-4 दिवसांत या प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडेल. IMD अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार या भागात चांगला पाऊस पडेल ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल.