8 कोटीच्या Rolls Royce कारचे मालक Sanjay Gaikwad यांच्याविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे जिल्ह्यातील (Thane) प्रसिद्ध बिल्डर संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rolls Royce owner Sanjay Gaikwad (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे जिल्ह्यातील (Thane) प्रसिद्ध बिल्डर संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर 35 हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्र महावितरण कंपनीच्या दिलेल्या तक्रारीनंतर कल्याण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण बिल भरल्याची माहिती प्रसारमाध्यमांत झळकत आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांनी नुकतीच 8 कोटी रुपयांची रोल्स रॉयस (Rolls Royce) कार खरेदी केली होती.

महावितरणने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संजय गायकवाड यांनी 12 जुलै रोजी 49 हजार 840 रुपयाचे बिल भरले आहे. यातील 34 हजार 840 रुपयांची वीज चोरीची आहे. यामुळे सेटलमेन्ट म्हणून त्यांनी 15 हजार रुपये दिले आहेत. त्यांच्याकडे अनेक महागड्या मोटारी आहेत आणि त्यांनी अलीकडेच 8 कोटी रुपयांची रोल्स रॉयस खरेदी केली होती. हे देखील वाचा- Mumbai: ड्रग्ज वापरुन केक तयार करणाऱ्या 25 वर्षीय डॉक्टरचा NCB कडून पर्दाफाश, आरोपीला अटक

महावितरणाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायकवाड यांनी सदर रक्कम भरली असल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले आहे. तर, हे मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. जर वीजचोरी झाली असेल, तर मग मीटर का नेलं नाही? असा संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.