Dispute Over Honeymoon Plans: जोडप्याच्या मधुचंद्राच्या ठिकाणावरुन कौटुंबीक वाद; जावयावर Acid फेकले, कल्याण येथील सासऱ्याचा कारनामा
मुलीसोबत हनिमून साजरा करण्याचे ठिकाण निवडताना झालेल्या वातातून त्याने हे कृत्य केले आहे.
अतिशय किरकोळ वादातून 29 वर्षीय जावई इबाद फलके याच्यावर ॲसिड (Acid Attack) फेकल्याच्या आरोपावरून ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील बाजारपेठ पोलिसांनी 65 वर्षीय झाकी खोतल या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. खोतल यांची मुलगी आणि इबाद फालके यांचा नुकताच विवाह झाला आहे. विवाहानंतर हे जोडपं मधुचंद्र (Honeymoon Dispute) साजरा करण्यासाठी कोठे जायचे यासाठी योजना आखत होते. दरम्यान, त्यांनी कश्मीरला जाण्याची निवड केली. मात्र, सासरा असलेल्या खोतल याने सौदी अरेबियामधील मक्का आणि मदिनाच्या तीर्थयात्रेचा आग्रह धरला. त्यास जावयाने नकार दिला आणि त्यातून निर्माण झालेल्या कौटुंबीक वादाचे (Domestic Dispute) पर्यावसन ॲसिड फेकण्यात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जीवे मारण्याची धमकी देऊन फेकले ॲसिड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई ईबाद फालके हा मधुचंद्रानिमित्त तीर्थयात्रेस जाण्यास तयार नव्हता. त्याला पत्नीसोबत कश्मीरला जायचे होते. आणि तो त्यावर ठाम होता. दरम्यान, कुटुंबीयांमध्ये वाद वाढला. इतका की, हा वाद चक्क लग्न रद्द करण्याच्या मागणीपर्यंत पोहोचला. या वादाची परिणती बुधवारी संध्याकाळी झालेल्या हिंसक हाणामारीत झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरुन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अधिक माहिती अशी की, घटना घडली त्या दिवशी बुधवारी सायंकाळी पीडित फालके हा सायंकाळी 7.45 च्या सुमारास आग्रा रोडवरील आशा टॉवर्सच्या बाहेर अभा होता. त्याच वेळी खोतल हा मोटारसायकलवरून तिथे आला. त्याने फालके यास आगोदर जीवे मारण्याची धमकी दिली आणि सोबत आणलेले ॲसिड त्याच्या अंगावर फेकले. ज्यामध्ये त्याचा चेहरा आणि शरीर गंभीररित्या भाजले.
पोलीस तपास आणि आरोप
झोन 3 चे डीसीपी अतुल झेंडे यांनी पुष्टी केली की, खोटल सध्या फरार आहे आणि त्याचा शोध घेतला जात आहे. बाजारपेठ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या खालील कलमांखाली खोटालवर गुन्हा दाखल केला आहेः
- कलम 124 (1) ॲसिड वापरून स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे.
- कलम 351 (3) मृत्यूच्या धमकीसह फौजदारी धमकी.
- कलम 352: शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर कृती करणे.
दरम्यान, ॲसिड हल्ल्याच्या घटना समाजमन हेलावून टाकतात. अशा प्रकारची घटना घडण्याचे प्रमाण अलिकडे कमी झाले असले तरी, ते संपले नाही. अजूनही अधुनमधून अनेक ठिकाणी अशा घटना घडतच असतात. पूर्वी महिला आणि मुलींवर ॲसिड फेकीच्या घटना घडत असत. आताही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे अधुनमधून पुडे येते. दरम्यान, घरगुती भांडणातून ॲसिड फेकल्याची पाठिमागील काही काळातीह बहुदा ही पहिलीच घटना आहे.