BMW Hit And Run Case: वरळी हिट-अँड-रन प्रकरणाशी संबंधीत जुहू येथील बारचे अनधिकृत बांधकाम बीएमसीने पाडले (Watch Video)

वरळी बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील (BMW Hit And Run Case) आरोपींनी अपघातापूर्वी बारला भेट दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर बीएमसीने ही कारवाई केली.

BMW Hit And Run Case | (Photo Credit - X)

मुंंबई येथील जुहू-तारा रोडवरील ( Juhu-Tara Road) एका बारचा (Juhu Bar) बेकायदेशीर भाग बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अतिक्रमण हटाव पथकने कारवाई करुन पाडला आहे. वरळी बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील (BMW Hit And Run Case) आरोपींनी अपघातापूर्वी बारला भेट दिल्याचे उघडकीस आले आहे. डॉन जिओव्हानी रेस्टॉरंट (जॉबेल हॉस्पिटॅलिटीज प्रायव्हेट लिमिटेड द्वारा संचालित) या बारचा मुंबई पोलिसांनी काल (10 जुलै) शोध घेतला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने (Excise Department) 23 वर्षीय मिहीर शहा या 23 वर्षीय तरुणाला मद्यपान जागा आणि मद्य उपलब्ध करुन देणाऱ्या बारचा परवाना निलंबित केला आहे. मिहीर शाह याच्यावर आरोप आहे की, त्याने कायद्याचे पालन करुन मद्यपान केले नाही. तसेच, बारनेही आवश्यक खबरदारी घेतली नाही. आरोपीने बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्यास चिरडले. ज्यामध्ये पुरुष वाचला मात्र त्याच्या पत्नीचे निधन झाले.

अवैध बारवर कारवाई

वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला बारमध्ये दारू दिली गेल्याची पुष्टी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी केली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही पहिली कारवाई आहे. या प्रकरणात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे. पुणे येथे पोर्श दुर्घटनेनंतर एका मद्यधुंद अल्पवयीन मुलाने दोन विद्यार्थ्यांना आपल्या वाहनाखाली चिरडले. त्यानंतर पुणे शहरातील अवैध बार पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई येथेही अशीच घटना घडल्याने मुंबई महानगर प्रदेशातील असंख्य बार अल्पवयीन संरक्षकांना दारू देणे आणि बंद करण्याच्या वेळेचे पालन न करणे यासह विविध उल्लंघनांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले. (हेही वाचा, Mumbai Hit And Run Case: शिंदे गटातील शिवसेना उपनेते Rajesh Shah पोलिसांच्या ताब्यात; आदित्य ठाकरे यांची कडक कारवाईची मागणी)

व्हिडिओ

मिहीर शाह याची दोन साथीदारांसोबत पार्टी

मिहीर शाह आणि ध्रुव जवाहर देधियासह इतर तिघांनी बारमध्ये प्रवेश केला होता. आरोपींना नियमाच्या पलीकडे जाऊन मद्य पुरवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जुहू बारला नोटीस बजावली. या प्रकरणातील आरोपी हा शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा (मिहीर) आहे. त्याने त्याची बीएमडब्ल्यूने एका जोडप्याच्या बाईकला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, ‘मम्मी माझे सर्वस्व! ती मला परत हवी’ वरळी येथील BMW Hit And Run मध्ये ठार झालेल्या कावेरी नाखवा यांच्या मुलीची आर्त हाक (Watch Video)))

व्हिडिओ

व्हिडिओ

दरम्यान, जुहू बारचा परवाना निलंबन उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांसमोर 19 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत प्रभावी आहे. अबकारी पोलिसांच्या तपासादरम्यान आढळलेल्या इतर अनियमिततांमध्ये परमिट नसलेल्यांना मद्यविक्री करणे, परवानगी नसलेल्या झोनमध्ये मद्यविक्रीचे व्यवसाय सुरु करणे. जे पदार्थ विक्री करण्यास परवानगी नाही त्यांची विक्री करणे अशा बाबींचा समावश आहे. दरम्यान, मद्यविक्री आणि मद्यसाठा करताना दिल्या जाणाऱ्या पावत्यांवर वाइस ग्लोबल तापस बार असे बारचे चुकीचे नाव छापल्याचाही धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. नियोजित सुनावणीचा निकाल येईपर्यंत बार उघडता येणार नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif