जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेशवारीला जाण्यासाठी विमानतळावर रोखले
आर्थिक डबघाईला गेलेल्या जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांना आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत विमानतळावर रोखले.
आर्थिक डबघाईला गेलेल्या जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांना आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत विमानतळावर रोखले. त्यावेळी गोयल हे परेशात जाण्यासाठी रवाना झाले होते. मात्र अमीरत एअरलाइन्सच्य विमानाने त्यांना परदेशात जात असल्याने कारवाई केली आहे.
नरेश गोयल आणि त्यांची पत्नी शनिवारी दुपारी अमीरात एअरलाइनच्या विमानाने मुंबईवरुन दुबईला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी विमान टेक ऑफ करण्यापूर्वी इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानातील दोन प्रवाशांना विमानातून उतरवण्याचे निर्देश दिले. हे दोन प्रवासी म्हणजे नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता होते.
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल हे दोन महिन्यांपूर्वी जेटच्या संचालक मंडळावरुन राजीनामा दिला होता. गेल्या 25 वर्षांपूर्वी नरेश गोयल यांनी पत्नी अनितासह मिळून जेट एअरवेजची चालवत होते. सध्या या दोघांवर 28 व्यापारी बँकांचे 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या जेट एअरवेजची विमान सेवा सध्या बंद आहे.