Jaslok Hospital मुंबई मध्ये आता संपूर्ण COVID19 Hospital; वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे NESCO Jumbo centre, SevenHills Hospital मध्येही बेड वाढवणार; BMC ची माहिती
तर NESCO Jumbo centre मध्ये येत्या 7 दिवसांमध्ये 1500 अधिक बेड्स वाढवण्यासाठी मुंबई महानगर पालिका काम करणार आहे.
मुंबई मध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्य पाहता मुंबई महानगर पालिकेसह (BMC) सारीच यंत्रणा सध्या अॅक्शन मोड वर येऊन काम करत आहे. मुंबईत दिवसागणिक अंदाजे 10 हजार नवे रूग्ण बाधित असल्याचं समोर येत असल्याने आता हॉस्पिटलमध्ये बेड्सची कमतरता जाणवू शकते यामुळे आता बेड्स वाढवण्यासाठी पालिका यंत्रणा काम करत आहे. आज मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील जसलोक हॉस्पिटल (Jaslok Hospital) हे आता पूर्णपणे कोविड 19 समर्पित हॉस्पिटल केले जाणार आहे. येथे केवळ कोविड रूग्णांवरच उपचार केले जातील. कोविड नसलेल्यांना आता जसलोक मध्ये प्रवेश नसेल याची नोंद नागरिकांनी घ्यावी असे पालिकेने आवाहन केले आहे.
दरम्यान जसलोक हॉस्पिटल मध्ये 250 कोविड बेड्स वाढवले जाणार आहेत. लवकरच बीएमसीच्या ऑनलाईन डॅशबोर्डवर देखील त्याची माहिती अपडेट केली जात आहे. यामध्ये 40 आयसीयू बेड्स हे शनिवार 17 एप्रिल 2021 पर्यंत वाढवण्याचा मुंबई महानगर पालिकेचा प्रयत्न असणार आहे.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये आज (15 एप्रिल) 30 अधिक आयसीयू बेड वाढवले जाणार आहेत. तर NESCO Jumbo centre मध्ये येत्या 7 दिवसांमध्ये 1500 अधिक बेड्स वाढवण्यासाठी मुंबई महानगर पालिका काम करणार आहे.
ANI Tweet
कोविड 19 चे निदान झाल्यानंतर लक्षणांनुसार उपचारपद्धती निवडण्याचा तसेच विनाकारण लोकांनी हॉस्पिटल बेड अडवून न ठेवण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे. तसेच 1916 किंवा रूग्णांच्या राहत्या ठिकाणानुसार बीएमसी वॉर रूम मध्ये संपर्क साधून बेडसाठी मदत मागावी अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी मदत होईल असे सांगण्यात आले आहे. Maharashtra Curfew Guidelines: राज्यात 1 मे पर्यंत लागू असलेल्या संचारबंदी मध्ये पहा नेमकं काय सुरू, काय बंद असेल?
काल मुंबई मध्ये मागील 24 तासांत 9,925 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 5,44,942 वर पोहोचली आहे. सध्या शहरामध्ये 87,443 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर काल 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.