महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: सांगली जिल्ह्यातील मतदारसंघ, पलुस-कडेगांव, मिरज, शिराळा यांसह इतर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह राजारामबापू पाटील, आर. आर पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील यांचे नेतृत्व लाभलेला सांगली जिल्हा अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. 2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याला बऱ्याच अंशी धक्का लागला.

(Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: सांगली हा तसा काँग्रेस विचार रुजलेला जिल्हा. राजकीयदृष्ट्या गेली अनेक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जात असे. परंतू, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र परिवर्तन घडले. या जिल्ह्याने शिवसेना-भाजप पक्षाच्या पारड्यात आपले जनमत टाकले. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. 2014 मध्ये परिस्थिती वेगळी होती. विद्यमान परिस्थितीत फारसा फरक नसला तरी, या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना हे आघाडी, युती करुन लढत आहेत. 2014 मध्ये हे सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. या पार्श्वभूमिवर या वेळची निवडणूक रंजक ठरणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ (Islampur Assembly Constituency), खानापूर विधानसभा मतदारसंघ (Khanapur-Atpadi constituency), जत विधानसभा मतदारसंघ (Jat Assembly Constituency), तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ (Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Constituency), पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ (Palus-Kadegaon Assembly Constituency), मिरज विधानसभा मतदारसंघ (Miraj Assembly Constituency), शिराळा विधानसभा मतदारसंघ (Shirala Assembly Constituency), सांगली विधानसभा मतदारसंघ (Sangli Assembly Constituency) कोणत्या पक्षाला आणि उमेदवारांना कौल देतात याबाबत उत्कटता वाढली आहे. या पार्श्वभूमिवर या जिल्ह्यातील मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्राचे माजी वनमंत्री, काँग्रेस नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक दिवंगत पतंगराव कदम यांच्यामुळे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्राला परीचित आहे. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर पतंगराव कदम हे गेली अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. मात्र, त्यांचे अकाली निधन झाले. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव विश्वजीत कदम हे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पोटनिवडणूक वगळता पतंगराव कदम यांच्या निधनानंतर इथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक पाह पडत आहे. त्यामुळे या वेळी जतना कशी कौल देते याबाबत उत्सुकता आहे.

पलूस-कडेगाव विधानसभा निकाल 2014

पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 1,12,523

पृथ्वीराज देशमुख, भारतीय जनता पक्ष – 88, 489

प्रवीण गोंदील, शिवसेना – 2,208

संदीप धनपाल, अपक्ष – 1,686

अंकुश पाटील , महाराष्ट्र नवनिर्माण सेना –879

मिरज विधानसभा मतदारसंघ

भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुरेश दगडू खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये काँग्रेस विरोधी लाटेमध्ये लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये जनतेने सत्तापरिवर्तन केले. यात मिरज विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुरेश दगडू खाडे निवडूण आले. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रा. सिद्धार्थ जाधव यांचा पराभव केला.

मिरज विधानसभा मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल

डॉ. सुरेश दगडू खोडे, भारतीय जनता पक्ष – 93, 795

प्रा. सिद्धार्थ जाधव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 29, 728

सी.आर सांगलीकर, अपक्ष – 21,598

तानाजी सातपुते, शिवसेना – 20,160

बाळासाहेब होनमोरे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 10,999

शिराळा विधानसभा मतदारसंघ

शिराळा विधानसभा मतदारसंघात या वेळी काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये कोणत्याही पक्षाची युती, आघाडी झाली नव्हती. त्यामुळे सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. असे असले तरीही इथे अटीतटीचा सामना झाला होता. 2014 मध्ये इथून भाजप उमेदवार शिवाजीराव नाईक विजयी झाले होते. शिवाजीराव नाईक यांना 85,363 मते मिळाली होती. तर त्यांच्याविरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मानसिंगराव पाटील यांना 81,695 मते मिळाली होती. म्हणजेच केवळ 3,668 मतांच्या फरकाने भाजप उमेदवार जिंकला होता. या वेळी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेना हे पक्ष सोबत आघाडी आणि युती करुन लढत आहेत. त्यामुळे हा सामना अधिक रोमहर्षी होईल यात शंकाच नाही.

शिराळा विधानसभा मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल

१) शिवाजीराव यशवंतराव नाईक, भाजप – 85,363

२) मानसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – 81,695

३) सत्यजित देशमुख, काँग्रेस – 45,135

४) नंदकिशोर निळकंठ, शिवसेना – 2,061

५) मोहन आटवडेकर, अपक्ष – 1,249

सांगली विधानसभा मतदारसंघ

सांगली मतदारसंघातील लढत यावेळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळची लढत काहीशी राजकीय तसेच भावनिकही असणार आहे. काँग्रेस विरोधी लाट आणि जनमताची भावना या जोरावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडूण आले. परंतू, यावेळी ही निवडणूक वेगळ्या अर्थाने महत्त्वाची आहे. काही महिन्यांपूर्वी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला. या वेळी जनतेची प्रचंड दैना झाली. लोकांना अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर पडावे लागले. या वेळी सरकारने जनतेला मदत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न जनतेला किती रुचले, सरकारी मदतीवर जनता खरोखरच समाधानी आहे का? हे सर्व मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

सांगली विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2014 निकाल

पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ, भारतीय जनता पक्ष – 80,497

मदन पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 66, 040

पृथ्वीराज पवार, शिवसेना – 21,598

सुरेश पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 4,718

श्रीमती स्वाती शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1,440

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह राजारामबापू पाटील, आर. आर पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील यांचे नेतृत्व लाभलेला सांगली जिल्हा अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. 2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याला बऱ्याच अंशी धक्का लागला. काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप, शिवसेनेत गेल्यामुळे या बालेकिल्ल्याला धक्का लागला. अनेक ठिकाणी बुरुज कोसळले, काही ठिकाणी किल्लेच जमीनदोस्त झाले. लोकसभा निवडणूक 2019 मध्येही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणूक 2019 बाबत प्रचंड उत्सुकता आहे.

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now