Jalgaon Unseasonal Rain: जळगावात वादळाच्या तडाख्यात सापडल्याने साडेपाचशे मेंढ्यांचा मृत्यू

यात घरांचे आणि शेती पिकांचे नुकसान झालं आहे.

Unseasonal Rain | Twitter

जळगाव (Jalgaon ) जिल्ह्यात अनेक भागात  काल रात्री वादळीवारा (Unseasonal Rain) आणि गारपिटीसह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यावेळी जोरदार वादळाच्या तडाख्यात सापडून सा़डेपाचशे मेंढ्यांचा मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मेंढपालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे मेंढपाळ हवालदिल झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी आता मेंढपालांनी केली आहे.

जामनेर तालुक्यामधील पिंपळगाव आणि नांदगाव परिसरातील शेत शिवारात वास्तव्यास असलेल्या भगवान कोळेकर आणि सीताराम कोळेकर या मेंढपाळांच्या मेंढ्या वादळात सापडल्या. वादळाचा तडाखा जोरदार असल्याने आणि बचावासाठी कोणताही आडोसा जवळ नसल्याने या मेंढ्या वादळ सहन करु न शकल्याने जागीच मरण पावल्या. या घटनेत मेंढी पालन करणाऱ्या मेंढपालांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान सलग पाचव्या दिवशी जळगाव जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यात घरांचे आणि शेती पिकांचे नुकसान झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने मुक्ताईनगर आणि जामनेर तालुक्यात नुकसान झालं आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रात्री झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून ज्ञानदेव मोतीराम पाटील या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif