Jalgaon Dudh Sangh Elections: जळगावात भाजप-शिंदे गटानं मारली बाजी, एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलचा दणदणीत पराभव
भाजप- शिंदे गटाने 20 जागांपैकी 16 जागांवर आपल्या नावी नोंदवल्या आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप- शिंदे गटाने 20 जागांपैकी 16 जागांवर आपल्या नावी नोंदवल्या आहेत. तर 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. तरी या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण भाजप शिंदे गटाने या निवडणुकीत मुसंडी मारली असुन एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलचा पराभव केला आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं तरी यापैकी एक जागा बिनविरोध असल्याने खडसेंच्या खात्यात फक्त तिन विजयी उमेदवार नोंदवल्या गेलेत. तरी या निवडणेकीत खुद्द एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकीनी खडसेंचा देखील पराभव झाला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पराभवानंतर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. तर विरोधी पक्षाकडून खोक्यांसह साम-दाम-दंड भेद नीतीचा वापर केला गेला, त्यामुळेच आम्हाला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. मात्र पराभव शेवटी पराभव असतो, तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिली आहे. (हे ही वाचा:- Jayant Patil Statement: निर्भया फंडातून खरेदी केलेली वाहनांचा उपयोग आमदारांच्या संरक्षणासाठी करत आहेत, जयंत पाटीलांचे वक्तव्य)
निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केला जात आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत धरणगाव मतदार संघातून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील तर जामनेर मतदार संघातून भाजप नेते गिरीश महाजन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.