महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघ, भुसावळ, रावेर,पाचोरा यांसह इतर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून

या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

Jalgaon | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: एकेकाळी खानदेश या अधिकृत नावाने ओळखला जाणारा जळगाव जिल्हा अलिकडील काही काळात शेती आणि राजकारण यामुळे महाराष्ट्राच्या पटलावर ठळकपणे उठून दिसतो. ठिबक सिंचनाद्वारे केली जाणारी कापूस शेती हा इथल्या कृषीसंस्कृतीत रुजलेला नवा आणि अत्याधुनिक पायंडा. उभ्या महाराष्ट्राने दखल घ्यावा असाच. केळीच्या पिकासाठी भारतात प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आता राज्याच्या राजकारणातही प्रभाव गाजवताना दिसतो. जळगाव जिल्ह्यात अमळनेर ,एरंडोल (Erandol), चाळीसगाव (Chalisgaon), चोपडा (Chopda), जळगाव ग्रामीण (Jalgaon Rural), जळगाव शहर (Jalgaon), जामनेर (Jamner), पाचोरा (Pachora), भुसावळ (Bhusawal), मुक्ताईनगर (Muktainagar), रावेर (Raver) हे विधानसभा मतदारसंघ येतात. विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमिवर या मतदारसंघातील राजकीय स्थिती, इतिहास आणि सध्यास्थिती पाहूया थोडक्यात

भुसावळ विधानसभा मतदारसंघ  

रावेर लोकसभा मतदासंघ अंतर्गत येणारा हा मतदारसंघ. भुसावळ विधानसभा मतदारसंघाची आणखीही एक महत्त्वाची ओळख आहे. इथे मोठे रेल्वे जक्शन आहे. इथून परराज्यात केळीची मोठी वाहतूक चालते. अशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड म्हणनही भुसावळ ओळखले जाते. सोबतच तापी नदीच्या तीरावर वसल्याने या शहराला सांस्कृतिक ओळखही आहे. इथे दोन मोठे आयुध निर्माण कारखाने, एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. अशा या महत्त्वपूर्ण मतदारसंघातून 2014 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे संजय सावकारे हे निवडूण आले होते. संजय सावकारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश झाल्टे अशी रंजक लढत त्यावेळी पाहायला मिळाली. या वेळी सामना कसा रंगतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भुसावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

संजय सावकारे – भाजप – 84814

राजेश झालटे – राष्ट्रवादी – 53811

संजय ब्राम्हणे – सेना – 5598

पुष्पा सोनवणे – काँग्रेस- 3005

रावेर विधानसभा मतदारसंघ

मराठा, लेवा, मुस्लीम, बौद्ध, गुर्जर, धनगर, माळी, कोळी, आदिवासी अशा विविध समाजांच्या मतदारांचा समावेश असलेला रावेर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राजकीय समिकरणं विरुद्ध टोकाची पाहायला मिळतात. एकनाथ खडसे, गिरीश महाजन असे भाजपचे तगडे नेते या मतदारसंघात प्रभावी ठरतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे हरिभाऊ जावळे विजयी झाले. परंतू, त्यांना फार मताधिक्य मिळवता आले नाही. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या शिरीष चौधरी यांचा पराभव केला.

रावेर विधानसभा मतदारसंग निवडणूक 2014 निकाल

हरिभाऊ जावळे – भाजप – 65,922

शिरीष चौधरी – का‌ँग्रेस – 55,922

गफ्फार मलिक – राष्ट्रवादी – 31,271

प्रल्हाद महाजन – शिवसेना – 14,928

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ

जळगाव शहरातील मध्यवर्ती भआग या मतदारसंघात येतो. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ हा कामगारवर्गबहुल भाग असलेला मतदारसंघ. जळगाव महानरपालिकेचे पूर्ण क्षेत्र या मतदारसंघात येते. त्यामुळे महानगरपालिका नगरसेवक, स्थानिक राजकारण, आघाडी-बिघाडी अशा सर्व गोष्टी मतदारसंघातील जय पराजयास कारणीभूत ठरतात. महानगरपालिका संख्याबळाचा विचार करता एकूण 75 जागांपैकी 57 नगरसेवक भाजप, 15 शिवसेना आणि 3 एमआयएम पक्षाचे नगरसेवक आहेत. या मतदासंघावर भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. त्यातही भाजप नते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा बराचसा प्रभाव या मतदारसंघावर पाहायला मिळतो. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी २०१४ साली आमदार असलेल्या सुरेश जैन यांचा पराभव केला होता. सुरेश जैन हे गेली 35 वर्षे आमदार होते.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०१४ निकाल

सुरेश भोळे – भाजप – 88,363

सुरेशकुमार जैन – शिवसेना – 46,049

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ

पाचोरा भडगाव हा विधासभा मतदारसंघ हा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गतच येतो. या मतदारसंघात शेतकरी, मजूर, नोकर, शिक्षक असा सर्वसमावेशी घटकांचा समावेश होतो. या मतदारसंघात सुमारे 104 गावं येतात. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना पक्षाचे किशोर अप्पा पाटील 87,520 हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलीप वाघ यांचा पराभव केला.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०१४ निकाल

किशोर अप्पा पाटील – शिवसेना – 87,520

दिलीप वाघ – राष्ट्रवादी – 59,177

उत्तम महाजन – भाजप – 20,712

डी एम पाटील – मनसे – 12,833

प्रदीप पवार – काँग्रेस – 4,904

जामनेर विधानसभा मतदारसंघ

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचे प्रभावक्षेत्र असलेला हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गिरीश महाजन यांचे या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व आहे. 2014 च्या निवडणूकीत गिरीश महाजन यांनी 1,03,498 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिंगबर केशव पाटील यांचा पराभव केला.

जामनेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०१४ निकाल.

गिरीश दत्तात्रय महाजन – भाजपा – 1,03,498

दिगंबर केशव पाटील – राष्ट्रवादी कॉंग्रेस – 67,730

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ एकनाथ खडसे यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. गेली अनेक वर्षे एकनाथ खडसे हे या मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत खडसे हे 85657 मते मिळवत विजयी झाले होते. युती सरकारमध्ये ते महसूलमंत्री आणि इतर जवळपास 12 मंत्रालयाचा कारभार पाहात होते. मात्र दरम्यानच्या काळात भोसरी येथील भूखंड घोटाळा चर्चेत आला आणि खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. आता तर भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे यांना तिकीटच नाकारले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून खडसे यांच्या कन्या या मतदारसंघातून भाजपच्या तिकाटवर निवडणूक लढवत आहे.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2014 निकाल

एकनाथ खडसे – भाजपा – 85657

चंद्रकांत निंबाजी पाटील – शिवसेना – 75949

अरुण पांडुरंग पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – 6499

या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल.  21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Amalner Vidhan Sabha Seat Bhusawal Chalisgaon Vidhan Sabha Seat Chopda Vidhan Sabha Seat Erandol Vidhan Sabha Seat Jalgaon Rural Vidhan Sabha Seat Jalgaon Vidhan Sabha Seat Jamner Vidhan Sabha Seat Know Your Assembly Constituency Maharashtra Assembly Elections Maharashtra Assembly Elections 2019 Maharashtra Vidhan Sabha Elections Maharashtra Vidhan Sabha Elections 2019 Muktainagar Vidhan Sabha Seat Pachora Vidhan Sabha Seat Raver Vidhan Sabha Seat अमळनेर विधानसभा मतदारसंघ एरंडोल विधानसभा मतदारसंघ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ चोपडा विधानसभा मतदारसंघ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ जामनेर विधानसभा मतदारसंघ पाचोरा विधानसभा मतदारसंघ बसप भाजप भुसावळ विधानसभा मतदारसंघ मनसे मिरज विधानसभा मतदारसंघ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ रावेर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस रासप विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणूक २०१९


संबंधित बातम्या

Share Now