हे 50-50 नवीन बिस्किट आहे का? या शब्दात ओवेसी यांनी महायुतीवर साधला निशाणा
भाजप-शिवसेना (BJP-ShivSena) महायुतीला बहुमत मिळाले असून 50-50 फॉर्म्युलावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागून 10 दिवस उलटले तरीदेखील राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. भाजप-शिवसेना (BJP-ShivSena) महायुतीला बहुमत मिळाले असून 50-50 फॉर्म्युलावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. यावर एमआयएम (MIM) पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी 50-50 नवीन बिक्सिट आहे का? असा प्रश्न उपस्थित करुन महायुतीवर निशाणा साधला आहे. आणखी किती वेळ 50-50 करणार आहात? महाराष्ट्राच्या जनतेसाठी थोडे ठेवा, असे बोलून ओवेसी यांनी भाजप- शिवसेना यांना टोलाही लगावला आहे.
महाराष्ट्रात आमचाच मुख्यमंत्री असणार यावरून दोन्ही पक्षात वाद पेटला आहे. तसेच अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यातच एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप-शिवसेना यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी ओवेसी म्हणाले की, हे 50-50 काय आहे, नवीन बिस्किट आहे का? आणखी किती वेळ 50-50 करणार आहात. महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीतरी ठेवा. साताऱ्यात पडलेल्या विनाशकारी पावसानंतर महायुतीने अजूनही काळजी घेतल्याचे दिसत नाही. प्रत्येकजण 50-50 बाबत बोलत आहे. 'सबका साथ सबका विकास' हेच आहे का ? या शब्दात ओवेसी यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. हे देखील वाचा- शिवसेना पक्षासोबत सत्ता स्थापनासाठी राष्ट्रवादी कडून कोणताही प्रस्ताव नाही- अजित पवार
एएनआय यांचे ट्विट-
गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजप- शिवसेना यांच्यात दुरावा आला होता. हवे तितक्या जागा न मिळल्याने शिवसेना- भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप- शिवसेना यांची युती झाली होती. तसेच त्यावेळी भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळवल्या असल्या तरी त्यांना राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना पक्षाची गरज भासत आहे.