कुख्यात माफिया दाऊदचा मृत्यू झाला की तो जिंवत आहे? केंद्र सरकारने एकदाचं ठरवून सांगावं - सचिन सावंत
कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या 2 दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. मात्र, भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरचं मृत्यू झाला की तो जिवंत आहे? हे केंद्र सरकारने एकदाचं ठरवून देशाच्या जनतेला सांगावं, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाल्याच्या बातम्या 2 दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. मात्र, भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरचं मृत्यू झाला की तो जिवंत आहे? हे केंद्र सरकारने एकदाचं ठरवून देशाच्या जनतेला सांगावं, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली आहे.
दाऊदला कोरोनाची लागण झाल्यानंतर पाकिस्तानच्या कराची येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या भारतातील माध्यमात येत आहेत. यातील सत्य काय आहे याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे, असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार पार; आज 64 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
दाऊद हा भारताचा शत्रू असून तो भारतासाठी मोस्ट वॉटेंड आहे. मात्र, 2014 पासूनचं दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पसरवण्याचे अनेक योगायोग झाले. परंतु, आतापर्यंत सहावेळा दाऊद मरुन जीवंत झाला आहे. मोदी सत्तेवर येताच आता दाऊदची खैर नाही, मोदींच्या नेतृत्वामुळे पाकिस्तान भयभीत झाला असून दाऊदही प्रचंड घाबरला आहे, मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या दाऊदने आयएसआयकडे संरक्षण वाढवून देण्यासाठी फोन केला, अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या.
दरम्यान, मोदी सरकारने संसदेला दिलेल्या उत्तरात दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही असे सांगितले होते. म्हणून या वाहिन्यांच्या प्रमुखांना 'रॉ'चे एजंट केले तर देशाला फायदा होईल असा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला आहे. देशातील चॅनेलवर हेडलाईन्स काय यावी हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व मोदींचे तथाकथित जेम्स बाँड अजित डोवाल ठरवत असतात. जेव्हा मोदी सरकारच्या विरोधात जनमत तयार होते, लोकांमध्ये नाराजी निर्माण होते, तेव्हा तेव्हा दाऊदला वाहिन्यांवर मारले जाते. किंवा यावेळी भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम हे विषय चर्चेला घेतले जातात, असंही सावंत यावेळी म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2020 06:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

