Director General of Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदासाठी हेमंत नगराळे? संजय पांडे, रजनीश सेठ हे अधिकारीही चर्चेत

यात संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड, हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान, सुरेंद्र कुमार पांडे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग, रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशी या अधिकऱ्यांची नावे आहेत.

Hemant Nagrale | (Photo Credit- Facebook)

महाराष्ट्र पोलीस महासंचालक(Maharashtra DGP) पदासाठी सनदी अधिकाऱ्यांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर निघाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस महासंचालक (Director General of Maharashtra Police:) पदावर कोणाची वर्णी लागणार याबबत चर्चा सुरु आहे. या पदासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे. मात्र, नगराळे ( IPS Officer Hemant Nagrale) यांच्यासोबत इतरही काही अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.

सुबोध जैस्वाल यांच्यानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदासाठी सध्यास्थितीत चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा आहे. यात संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड, हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान, सुरेंद्र कुमार पांडे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग, रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशी या अधिकऱ्यांची नावे आहेत. परंतू, अनुभव आणि इतर कामगिरी पाहता हेमंत नगराळे यांचे नाव निश्चित समजले जात आहे. (हेही वाचा, पोलिसांना जास्तीत जास्त निवासस्थाने उपलब्ध होणार, मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे भव्य कलादालन उभारले जाणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश)

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेचा विचार करता नगराळे हे दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांच्या आधीर संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. संजय पांडे हे जून 2021 मध्ये सेवानिवृत होत आहेत. त्यामुळे सहाजिकच नगराळे हे सेवाज्येष्ठतेच्या मुद्द्यानुसार दुसऱ्या क्रमांकावर येतात. परंतू, एकूण काळ आणि इतर गोष्टी विचारात घेता हेमंत नगराळे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, सुबोधकुमार जैस्वाल यांच्या दिल्लीला जाण्यावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. ठाकरे सरकारची धोरणे आणि वर्तन पाहूनच सुबोध जैस्वाल यांच्यासाख्या कार्यक्षम अधिकाऱ्याने दिल्लीकडे प्रतिनियुक्तीवर जावे लागले आहे. जैस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवर जाण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे.