चिपी विमानतळाबद्दल '८' खास इंटरेस्टिंग गोष्टी
कोकणात विमानसेवा सुरू होणार या कल्पनेनेच कोकणवासीय सुखावले होते. आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पहिलं यशस्वी लॅन्डिंग झालं आहे. आता दसरा, दिवाळीचा मुहूर्त साधत कोकणामध्ये प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. मग तळ कोकणातील हे विमानतळ कसं आहे? त्याबद्दलच्या काही खास गोष्टी वाचा आणि भविष्यात नक्की प्रवास कराच...
चिपी विमानतळाबाबत खास गोष्टी
- चिपी विमानतळाचा रनवे 3170 मीटरचा आहे. यावर सुमारे 175 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
- चिपी विमानतळाचा रनवे 275 हेक्टर्स भागात पसरला आहे. या विमानतळावर Airbus A320 आणि Boeing 737 सारखी विमानं उतरू शकतात.
- सिंधुदुर्गात सुरू होणारे हे नवे विमान चिपी वाडीमध्ये आहे. परूळे गावातील या चिपी गावाचं नावं विमानतळाला देण्यात आलं आहे. चिपी ही पूर्वी पठार होतं.
- चिपी विमानतळापासून कुडाळ २४ किलोमीटर, तर मालवण १२ किलोमीटर अंतरावर आहे.
- चिपी विमानतळावर देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे.मात्र त्यासोबत आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमाने उतरू शकतील.
- लवकरच माल्टावरून आंतरराष्ट्रीय विमान चिपी विमानतळावर उतरवले जाणार आहे. जून महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्ण होईल.
- चिपी विमानतळावर 200 प्रवासी एकावेळेस ये-जा करू शकतात. भविष्यात ही सोय वाढवली जाऊ शकते.
- चिपी विमानतळाची क्षमता सुमारे 400 प्रवासी हाताळण्याची आहे.