INDIA Bloc Meeting: सत्ता स्थापनेसाठी दावा? इंडिया आघाडी सक्रीय; दिल्लीमध्ये खलबतं, शरद पवार, सुप्रिया सुळे राजधानीकडे रवाना

त्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे मुंबईतून सकाळी दिल्‍लीला रवाना झाले. 

Photo Credit- X

INDIA Bloc Meeting: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेची रस्सीखेच सुरू झाली आहे. राजधानी दिल्‍लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्‍यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि सुप्रिया सुळे(Supriya Sule) मुंबईतून सकाळी दिल्‍लीला रवाना झाले. आहेत तर दुसरीकडे एनडीएच्या बैठकीसाठी नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. राष्‍ट्रवादी शरद पवार गटाने महाराष्‍ट्रात लोकसभेच्या 8 जागा जिंकल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी 1,58,333 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 Results: 'त्यांनी आमचे सरकार पाडले, आमचा पक्ष फोडला...'; निवडणूक निकालानंतर Aaditya Thackeray यांनी व्यक्त केल्या भावना (See Post))

पोस्ट पाहा-

इंडिया आघाडीला मिळालेले चांगले यश हे नव्या राजकीय समीकरणांची नांदी दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे. यात सर्व समविचारी पक्षा बैठकीच आमंत्रण देण्यात आलं आहे. आज बुधवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. याशिवाय नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif