Extortion Case: पिंपरी चिंचवडमध्ये दुकानदारांकडून पैसे उकळल्याप्रकरणी भाजप नगरसेवकासह चार जण अटकेत
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पिंपरी कॅम्प परिसरात काही लोक दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून पैसे उकळत असल्याच्या अर्जाची पोलिस चौकशी करत होते.
भाजपचे (BJP) विद्यमान नगरसेवक (Corporator) आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे (PCMC) माजी उपमहापौर केशव घोळवे आणि इतर चार जणांना बुधवारी पहाटे पिंपरी चिंचवड पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली अटक (Arrest) केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पिंपरी कॅम्प परिसरात काही लोक दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून पैसे उकळत असल्याच्या अर्जाची पोलिस चौकशी करत होते. याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घोळवे यांना पिंपरी पोलीस ठाण्यातील (Pimpri Police Station) कर्मचार्यांनी अटक केल्याची पुष्टी केली. हेही वाचा Sharad Pawar Statement: शरद पवारांनी वाईन विक्रीवर केलेल्या वक्तव्यावर भाजपने दिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्यांना अयोग्य काही कळते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
पिंपरी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले की, घोळवे याच्यासह पाच जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपचे नगरसेवक घोळवे नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत शहराचे उपमहापौर होते.