पेट्रोल-डिझेल वरील कर वाढ थांबवून तंबाखू जन्य पदार्थांवर 'कोरोना सेस' आकारा; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारकडे मागणी
पेट्रोल-डिझेल वरील कर वाढ थांबवून सिगारेट आणि तंबाखू जन्य पदार्थांवर (Tobacco Cigarette) 'कोरोना सेस' (Corona Cess) आकारून महसुल तूट भरून काढा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Bala Nandgaonkar) यांनी सरकारकडे केली आहे.

बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात सरकारला विनंती करताना म्हटलं आहे की, 'सध्या कोरोना महामारीमुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात घटला आहे. सरकार त्याची भरपाई वारंवार पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढवून करत आहे. परंतु, त्याऐवजी सरकारने सिगरेट आणि तंबाखूजन्य गोष्टींवर 'कोरोना सेस' लावून ही महसुली तूट भरुन काढावी आणि पेट्रोल व डिझेलवर नवनवीन कर लादणे तात्काळ थांबवावे.' (हेही वाचा - मुंबई: दादर मधील इमारतीच्या कड्यावरून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, Watch Video)
दरम्यान, शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 63 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 60 पैशांची दरवाढ झाली. याआधीदेखील बाळा नांदगावकर यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून सरकारवर टिका केली होती. त्यावेळी त्यांनी इंधनावरील कर वाढवण्यापेक्षा मद्यावरील करात वाढ करा, अशी मागणी केली होती.