Mumbai Water Cut Revoked: पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, आजपासून मुंबईची पाणी कपात मागे, तलावामध्ये लक्षनीय वाढ
त्यामुळे शहरात पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय महानगर पालिका प्रशासनाने घेतला आहे. ३० मे रोजी 5 % पाणी कपात होते.
Mumbai Water Cut Revoked: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाले आहे. त्यामुळे शहरात पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय महानगर पालिका प्रशासनाने घेतला आहे. 30 मे रोजी 5 % पाणी कपात होते. सोबत 5 जून पासून १० % पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु सोमवार पासून 29 जुलै पासून शहरातील सात प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा 72 % जमा झाला आहे. बराच तलावामध्ये लक्षनीय वाढ झाली आहे. (हेही वाचा- पुणे शहरात अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा, पाणी उकळण्याचे रहिवाशांना आवाहन)
जून महिन्यात पावसाने दांडी मारली त्यामुळे जून महिन्यात परिस्थिती पाहून महानगरपालिकेने 10 % पाणी कपात केले. तसेच, ठाणे शहर, भिंवडी व इतर विभागातील ग्रामपंचायतींना मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर जुलै महिन्यात पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. सलग तिसऱ्या वर्षी मुंबई शहरला 10 % पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईतील सात धरणांपैकी तुळशी, तानसा, विहार, मोडकसागर जलाशय पूर्णपणे भरले आहेत. तर सर्वात मोठे भातसा धरणही 70 टक्क्याहून अधिक भरले आहेत. शहराला पाणी पुरेल त्यामुळए पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.