Maharashtra Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रात 28 जून पासून मान्सून साठी अनुकूल हवामानाचे अंदाज, राज्यातील पावसाची आतापर्यंतची टक्केवारी जाणून घ्या

Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 28 जून पासून पावसासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. जून महिन्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी मांडणारा एक चार्ट तपासुन पहा.

Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Monsoon 2020 Updates: हवामान खात्याचे (IMD)  प्रमुख के एस होसाळीकर (K.S. Hosalikar)  यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 28 जून पासून पावसासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. मुंबई, मराठवाडा, विदर्भ,कोकण आणि तळकोकण भागात पाऊस येत्या आठवड्यात समाधानकारक होईल याचाच अर्थ म्हणजे संपूर्ण राज्यात मान्सून व्यापक असेल असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. अशावेळी मुंबई मध्ये ढगाळ तर कधी निरभ्र आकाश राहील. सध्याच्या अपडेटनुसार पुढील 48 तास मुंबईमध्ये अगदीच तुरळक पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान, होसाळीकर यांनी जून महिन्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी मांडणारा एक चार्ट सुद्धा शेअर केला आहे. Monsoon Updates 2020: भारताच्या उत्तर, मध्य, ईशान्य भागात 25 ते 28 जून दरम्यान कसा असेल मान्सूनचा प्रवास; पहा IMD चा अंदाज

के एस होसाळीकर मध्ये दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुरुवातीचा एक आठवडा म्हणजेच 3  जून ते 10 जून दरम्यान राज्यात सर्वत्र 60 टक्के हुन अधिक पाऊस झाला होता. तर दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10 ते 17 जून दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 60 टक्के हुन अधिक तर मार्थवाड्यात सर्वात कमी पाऊस झाला होता. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा कोकणात 20 ते 60 % पाऊस झाला तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 60 हुन अधिक टक्के पाऊस होता.

K. S. Hosalikar Tweet

दरम्यान, मागील आठवड्यात संपूर्ण राज्यात कमी पावसाची नोंद झाली होती मात्र येत्या आठवड्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती असेल असे अंदाज आहेत.